crime news in up prayagraj esakal
देश

UP : शाळकरी विद्यार्थ्यांनी टोळ्या तयार करत ३ महिने घडवले बॉम्बस्फोट; ११ जणांना अटक

प्रतिष्ठित शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रतिष्ठित शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून उत्तर प्रदेशातील एका शहरात बॉम्बस्फोटांची मालिका सुरू होती. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटकही केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी परिसरात आपलं वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूनं दोन गटांमध्ये संघर्ष सुरू होता. हा संघर्ष थेट बॉम्बस्फोट घडवण्यापर्यंत पोहोचला असल्यानं शहरवासियांच्या चिंतेंत वाढ झाली आहे. प्रतिष्ठित शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. (Crime News)

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी अटक कलेल्या ११ जणांपैकी १० जण अल्पवयीन असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या कारनाम्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या गटांशी त्यांच्या पालकांचाही संबंध असल्याचं दिसून आलं असल्यानं पोलिसांकडून अशा पालकांना इशारा देण्यात आला आहे. स्फोट घडवणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रतिष्ठित शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या टोळ्या तयार केल्या होत्या. परिसरात आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू होता. वचक बसवण्यासाठी त्यांनी बॉम्बस्फोट घडवले. विद्यार्थ्यांच्या टोळ्या व्हॉट्स ऍपवरही सक्रिय होत्या. तांडव, जॅग्वार, माया, लॉरेन्स, इम्मॉर्टल्स अशा नावांनी त्यांनी व्हॉट्स ऍप ग्रुप तयार केले होते. त्यात १० ते ३०० सदस्य होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जुलैमध्ये शाळांच्या बाहेर बॉम्बस्फोटाच्या ५ घटना घडल्या. यातील पहिली घटना संगम परिसरात घडली. एका शाळेचे विद्यार्थी त्यांच्यातील एकाचा वाढदिवस साजरा करत असताना स्फोट घडवण्यात आला. बॉम्बस्फोटाची दुसरी घटना एमपीव्हीएमजवळ घडली. यानंतर पतंजली ऋषीकुल, बॉईज हायस्कूल, बिशप जॉन्सन स्कूल परिसरात स्फोट झाले.

सोमवारी बिशप जॉन्सन कॉलेजजवळ पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना पकडलं. बॉम्ब कुठून आणले याबद्दल त्यांना विचारणा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली. आपण बॉम्ब कुठून आणले नाहीत, तर घरातच यूट्यूब पाहून तयार केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT