देश

उत्तर प्रदेशचं होणार विभाजन? ; केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय

पूर्वांचल होणार नवं राज्य?

शर्वरी जोशी

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विभाजनाची जोरदार चर्चा रंगली आहे. केंद्र सरकार (central government) उत्तर प्रदेशचं दोन ते तीन भागांमध्ये विभाजन करणार असल्याचा म्हटलं जात आहे. इतकंच नाही तर, उत्तर प्रदेशचं विभाजन केल्यानंतर पूर्वांचल हे नवं राज्य स्थापन करण्यात येईल, असा दावादेखील करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या उत्तर प्रदेशासह (Uttar Pradesh) अन्य राज्यांमध्येही या विभाजनाची जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु, व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये नेमकी किती सत्यता आहे हे पीआयबीने चेक केलं असून सत्य समोर आणलं आहे. (uttar-pradesh-to-be-divided-into-three-parts-by-central-government-know-truth-fact-check)

उत्तर प्रदेशमधील वाढती लोकसंख्या पाहता २००० मध्ये या राज्याचं विभाजन करण्यात आलं होतं. या विभाजनानंतर उत्तर प्रदेशमधून उत्तरांचल (उत्तराखंड) हे नवीन राज्य तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा या राज्याचं विभाजन होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, व्हायरल होणारा हा मेसेज फेक असल्याचा दावा पीआयबीने केला आहे. याविषयी पीआयबीने ट्विट करुन सत्य उघड केलं आहे.

सोशल मीडियावर रंगलीये 'ही' चर्चा

उत्तर प्रदेशमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांपूर्वी राज्याचे दोन ते तीन भागांमध्ये विभाजन होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची बैठक झाली असून या बैठकीत उत्तर प्रदेशच्या विभाजनावर सहमती दर्शविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या बैठकीनंतर आता योगी आदित्यनाथ हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद योच्यासोबत बैठक करणार आहेत.

खरंच उत्तर प्रदेशचं विभाजन होणार ?

एका बातमीमध्ये उत्तर प्रदेशचं दोन ते तीन भागांमध्ये विभाजन होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यातून पूर्वांचल व अन्य राज्ये तयार केले जातील असा दावाही यात करण्यात आला आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. उत्तर प्रदेशचं विभाजन करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही, असं ट्विट पीआयबीने केलं आहे.

'या' कारणामुळे सुरु झाली विभाजनाची चर्चा

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यना यांनी दिल्ली दौरा केला होता. यावेळी त्यांची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह,भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत झाली. विशेष म्हणजे या भेटीनंतर उत्तर प्रदेशचं विभाजन होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, पीआयबीने केलेल्या फॅक्ट चेकमुळे सत्यपरिस्थिती उघड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT