cm dhami sakal
देश

CM Dhami: उत्तराखंडमध्ये लवकरच AI चे सेंटर ऑफ एक्सीलेन्स; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

To meet the goal of implementing Artificial Intelligence (AI) in the state: त्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सेंटर ऑफ एक्सीलेन्स बनवण्याची घोषणा केलेली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Uttarakhand: AI आपल्या जीवनातील एक प्रभावशाली भाग झालेला आहे. उत्तराखंडमध्ये विज्ञान तंत्रज्ञान, आधुनिकीकरण करण्यासोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI चा विकास करण्यासाठी एक आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री धामी यांनी दिली.

AI कडून अनेक सोयी सुविधा प्राप्त होत आहेत. आता हेच AI तंत्रज्ञान राज्याच्या विकासाची महत्त्वपूर्ण ठरू शकेल. तसेच शेती, उद्योग, औषधे, शिक्षण, आरोग्य, विज्ञान यांमध्ये विकास करण्यासाठी AI चा महत्त्वपूर्ण सहभाग देखील होऊ शकतो.

उत्तराखंड राज्याला नैसर्गिक संसाधने, सांस्कृतिक वारसा तसेच उत्कृष्ठ मानवी संसाधनांचा साठा लाभलेला आहे असेही मुख्यमंत्री म्हटले. ते पुढे म्हणाले, AI चा वापर योग्य पद्धतीने केला तर समजू शकेल की नैसर्गिक साधनसंपत्तीचा कशाप्रकारे चांगला उपयोग करता येईल. शेती, आरोग्य, शिक्षण तसेच इतर क्षेत्रात AI यशाची संधी वाढवेल. राज्यात होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती तसेच हवामानातील बदल यांना समजून घेण्यात AI तंत्रज्ञान मदतगार ठरेल. केंद्र सरकार सोबत उत्तम समन्वय साधून राज्यामध्ये AI ची यंत्रणा बनवण्यात येईल.

येणारं भविष्य हे AI च्या जगातील असणार आहे असे, यूसीओएसटी ( उत्तराखंड स्टेट काऊन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी) चे महासंचालक प्रोफेसर दुर्गेश पंत म्हटले. देवभूमी बरोबरच उत्तराखंड हे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक क्रांतीची भूमी आहे. इथे अनेक केंद्रीय संस्थाने आहेत. AI ला राज्याच्या विकासासोबतच शेती, पर्यटन, सुशासन, उपजीविका, आरोग्य, शिक्षण यांसारख्या क्षेत्रातही लक्ष केंद्रित करायचे आहे. यावर लवकरच प्रभावी विचारमंथन केले जाईल.

यानिमित्ताने दिनेश त्यागी म्हटले की, उत्तराखंड मध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत. AI ला अधिक प्रभावशाली करण्यासाठी मूलभूत पायाभूत निर्माण करण्याची गरज आहे. AI च्या मदतीने नागरिकांना उत्तम सुविधा पुरवणे हेच आमचे ध्येय आहे. राज्यातील तरुणांना यामुळे मोठ्या रोजगार संधी सुद्धा उपलब्ध होण्यास मदत होईल.

काळासोबत AI ची गरज आता महत्त्वपूर्ण झालेली आहे असे, प्रोफेसर ओम प्रकाश सिंह नेगी म्हटले. या तंत्रज्ञाना मार्फत आधुनिकीकरण, गुणवत्ता यांमध्ये सुधारणा करायची आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये देखील AI चा वापर करणे आवश्यक आहे, आमचे प्रयत्न असतील की AI तंत्रज्ञानाद्वारे दूरस्थ शिक्षण पद्धती अधिक प्रभावशाली असावी. शिक्षण व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी आधुनिक कल्पना उपयुक्त ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT