action against coaching centers  sakal
देश

Coaching Classes: दिल्लीतील घटनेनंतर राज्यात सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसची होणार चौकशी, CM धामी यांचे आदेश

Dehradun News : दिल्ली कोचिंगच्या घटनेनंतर उत्तराखंड सरकारही जागे झाले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः राज्यात सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसची कसून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Dehradun : दिल्लीतील घटनेनंतर आता उत्तराखंडमधील कोचिंग क्लासेस वर मोठी हालचाल होणार आहे. दिल्लीतील एका कोचिंग क्लास च्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा (2 मुली, 1 मुलगा) मृत्यू झाला.

या घटने नंतर आता उत्तराखंड सरकारही जागे झाले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः राज्यात सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसची कसून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोचिंग सेंटरमध्ये शिकणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी केलेल्या व्यवस्थेचीही पाहणी करावी, असे सांगितले. यासाठी राज्यव्यापी मोहीम राबविण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. कोचिंग क्लासेसची पार्किंग व्यवस्था आणि त्यांच्या आजूबाजूला रहदारी सुरळीत व्हावी याकडेही लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुसळधार पावसामुळे तळघरात

पाणी साचण्याची शक्यता असते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारच्या आपत्तीचे लगेच निवारण करता यावे म्हणून राज्यात सुरू असलेली सर्व कोचिंग सेंटर्स आणि जिथे इमारतींच्या तळघरात असे क्लासेस किंवा काही उपक्रम राबवले जात असतिल, तर त्यांची तत्परतेने चौकशी करून तिथे गरजे प्रमाणे कारवाई करावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होण्याआधी टाळता येईल.

सीएसची कारवाई

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, सीएस राधा रातुरी यांनी राज्यातील सर्व डीएमना राज्यात सुरू असलेल्या सर्व कोचिंग क्लासेस किंवा तळघरात उपक्रम होत असणार्‍या इमारतींची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात जारी केलेल्या सूचनांमध्ये मुख्य सचिवांनी म्हटले आहे की, पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नवी दिल्लीतील एका नामांकित कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने झालेली अप्रिय घटना लक्षात घेता, उत्तराखंडमधील सर्व कोचिंग सेंटर्स आणि अशा इमारतींवर कारवाई करावी. ज्यामध्ये तळघर आहे व तिथे अनेक प्रकारचे मानवी उपक्रम केले जातात, तिथे सुरक्षा संबंधित योग्य तो निर्णय घेऊन आणि नियमांनुसार सर्व तपासले पाहिजे.

सीएसच्या सूचना

  • सर्व डीएमनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घ्यावी.

  • जिल्ह्यातील सर्व कोचिंग सेंटरची तपासणी करण्यासाठी समिती स्थापन करावी.

  • नमूद केलेल्या ठिकाणांची समितीमार्फत चौकशी करून ज्या काही उणीवा असतिल त्या दूर करण्यात याव्यात.

  • ज्या इमारतींमध्ये पाणी लगेच भरू शकते व ते सुधारणे अशक्य आहे, तेथे पावसाळा संपे पर्यन्त कोणताही उपक्रम होणार नाही.

  • जेणेकरून पावसाळ्यात पाणी साचल्याने होणारी कोणतीही दुर्घटना टाळता येईल.

  • याबाबत सरकारने काय कार्यवाही केली याची माहिती १५ दिवसांत द्यावी.

ज्या इमारतींच्या तळघरात सर्व मानवी उपक्रम चालतात, अशा इमारतींमध्ये  सुरक्षा उपकरणांची तपासणी करण्यात यावी, असे मुख्य सचिवांनी म्हटले आहे. याशिवाय त्या कोचिंग सेंटरमध्ये उपलब्ध अग्निसुरक्षा उपकरणे आणि अलार्म किंवा आग लागल्यास बाहेर काढण्याचा मार्ग स्पष्टपणे चिन्हांकित केला आहे का, हेही तपासण्यास सांगितले आहे.

इमारतींमध्ये बसवण्यात आलेल्या इलेक्ट्रिक सिस्टिमची चौकशी

सुरक्षा निकषांची तपासणी करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे. इमारत मालकाने आवश्यक एनओसी घेतली आहे की नाही तेही पाहणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT