डेहराडून : उत्तराखंडमध्ये येत्या २२ जूनपर्यंत कोविडमुळे लागू केलेल्या संचारबंदीत वाढ केलेली असताना तीन जिल्ह्यातील नागरिकांसाठी चारधाम यात्रेला परवानगी दिली आहे. अर्थात चारधाम यात्रेसाठी आरटीपीसीआरचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे गरजेचे असल्याचे उत्तराखंड सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी दिली. (Uttarakhand to open Char Dham yatra for locals read the rules)
दरम्यान, राज्यांतील मिठाईचे दुकान आठवड्यातील पाच दिवस सुरू राहणार असून अन्य दुकानांना तीन दिवसांची परवानगी असेल. राजधानी डेहराडून येथे विक्रम सेवा, टेम्पो सेवा आणि शहर वाहतूक सुरु राहणार आहे. विवाह सोहळ्यात आता ५० जणांना उपस्थित राहता येणार आहे. राज्यातील तीन जिल्ह्यातील भाविकांसाठी चारधाम यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. चमोली, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग जिल्ह्यांसाठी चारधाम यात्रा करता येणार आहे. परंतु आरटीपीसीआर बंधनकारक आहे. परंतु राज्यातील सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, क्रीडांगण, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडोटोरियम, बार बंदच राहणार आहेत. कोवीड संचारबंदीच्या काळात आंतरराज्यीय वाहनांची वाहतूक शंभर टक्क्यांसह सुरू होणार आहे. उत्तराखंड बस ऑपरेटर्स संयुक्त महासंघाचे अध्यक्ष जीतसिंह पटवाल म्हणाले की, सरकारने शंभर टक्के क्षमतेसह बस सुरू करण्यास परवानगी सरकारने दिल्याने आजपासून बस सुरू झाल्या आहेत. पर्वतीय भागात सेवा कार्यान्वित झाल्याचे ते म्हणाले. प्रवासापूर्वी आणि नंतर बसचे सॅनिटायजेशन केले जाणार आहे.
पर्वतीय जिल्ह्यांत जाण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक
उत्तराखंडला येणाऱ्या नागरिकांसाठी ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट गरजेचा
गढवाल आणि कुमाऊंदरम्यानच्या प्रवासासाठी आरपीसीआरची गरज नाही.
ऑनलाइन नोंदणी आवश्यक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.