Uttarakhand Tunnel Collapse Rescue 
देश

Uttarakhand Tunnel Collapse Rescue: ४१ कामगार ३-४ तासांत बोगद्यातून बाहेर पडतील, NDMA सदस्य काय म्हणाले?

Sandip Kapde

Uttarakhand Tunnel Collapse Rescue: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. १७ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या कामगारांना आज म्हणजेच मंगळवारी बाहेर काढण्यात येणार आहे. एनडीएमएने ही माहिती दिली आहे. कामगारांना बाहेर काढण्यासाठी ३ ते ४ तास लागतील असे त्यांनी सांगितले. बचाव कार्यादरम्यान बोगद्याजवळ रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत.

उत्तरकाशी येथे बोगद्यात अडकलेले ४१ कामगार तीन ते चार तासांत बाहेर पडतील, असे एनडीएमएचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी सांगितले. आम्ही यशाच्या जवळ आहे. मॅन्युअल काम चालू आहे आणि आम्ही ५८ मीटरपर्यंत पोहोचलो आहोत. तज्ञ आणि लष्कराचे अभियंते यशस्वी झाले आहेत. ते ५८ मीटरपर्यंत नेऊन ऑगर मशीनच्या साहाय्याने पाईप पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती एनडीएमए सदस्यांनी दिली.

एनडीएमएचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन म्हणतात, "आम्ही यशाच्या जवळ आहोत. मॅन्युअल काम चालू आहे आणि आम्ही ५८ मीटरपर्यंत पोहोचलो आहोत. ढिगारा कापला गेला आहे आणि काम सुरू आहे. संपूर्ण रात्र काम सुरु होते. रॅट मायनर्स तज्ञ आणि आर्मी अभियंते ५८ मीटरपर्यंत नेण्यात यशस्वी झाले आहेत आणि ऑगर मशीनच्या मदतीने पाईप पुढे ढकलण्यात आला आहे..." (Latest Marathi News)

ऋषिकेश एम्स अलर्ट मोडवर आहे. ट्रॉमा सेंटरसह ४१ खाटांचा वॉर्ड तयार आहे. ट्रॉमा सर्जनसह हृदय व मानसोपचार तज्ञ डॉक्टरांचे पथक तयार आहे. ऋषिकेश एम्सच्या हेलिपॅडवर एकाच वेळी तीन हेलिकॉप्टर उतरवता येतील. गंभीर स्थितीत असलेल्या कामगारांना तेथे नेले जाऊ शकते.

मात्र चिनूक हेलिकॉप्टर उड्डाण करण्याची शेवटची वेळ दुपारी साडेचार वाजता आहे. आम्ही ते रात्री उडवणार नाही. उशीर होत असल्याने, कामगारांना दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशला नेले जाईल, अशी माहिती सय्यद अता हसनैन यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: एसबीआयने करोडो ग्राहकांना दिला झटका ते शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का?

आजचे राशिभविष्य - 16 नोव्हेंबर 2024

Panchang 16 November: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण करावे

Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Mumbai Local Mega Block: रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

SCROLL FOR NEXT