Uttarakhand tunnel:  
देश

Uttarakhand tunnel: तुमचे साहस आणि धैर्य...; कामगारांच्या सुटकेनंतर पंतप्रधान मोदींची पोस्ट

उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ मजूरांना बाहेर काढण्यामध्ये अखेर यश आलं आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ मजूरांना बाहेर काढण्यामध्ये अखेर यश आलं आहे. तब्बल १७ दिवसांनी कामगारांनी मोकळ्या आकाशात श्वास घेतला आहे. कामगारांना बाहेर काढण्याची मोहीम यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन आनंद व्यक्त केला आहे. (uttarakhand tunnel rescue All 41 workers trapped evacuated after 17 days pm narendra modi post)

उत्तरकाशीमध्ये आपल्या कामगारांच्या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये आलेले यश भावुक करणारे आहे. बोगद्यामध्ये अडकलेल्या कामगारांना मी सांगू इच्छितो की, तुमचे साहस आणि धैर्य सगळ्यांना प्रेरित करत आहे. मी तुमच्या सर्वांच्या उत्तम आरोग्याची प्रार्थना करतो, असं मोदी म्हणाले.

समाधानाची बाब आहे की खूप काळाने आपले बांधव त्यांच्या कुटुंबीयांशी भेटतील. त्यांच्या कुटुंबीयांनी देखील अशा कठीणवेळी संयम आणि धैर्याचे प्रदर्शन केले आहे. त्याचे जितके कौतुक व्हावे तितके कमी आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

बचावकार्यात जोडल्या गेलेल्या सर्वांच्या कार्याला मी सलाम करतो. त्यांचे शौर्य आणि संकल्पशक्ती याने आपल्या श्रमिक बांधकांना नवीन जीवन दिलं आहे. या ऑपरेशनमध्ये सहभागी सर्वांनी मानवता आणि टीम वर्कचे एक अद्भूत उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे, असंही मोदी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT