उत्तराखंड येथील उत्तरकाशी टनल मध्ये मागील चौदा दिवसांपासून ४१ कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर काम केलं जात आहे. यादरम्यान कछयारी-भंगवार फोरलेन प्रोजेक्टसाठी बांधल्या जात असलेल्या ट्विन टनल मध्ये सुरक्षेसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) ने अॅडव्हायजरी जारी केली आहे.
याअंतर्गत आता बोगद्याच्या खोदकामादरम्यान मदत आणि बचाव कार्यासाठी पाईपलाइन टाकण्यात येणार आहे. बोगद्याच्या बांधकामाचे काम करणाऱ्या कंपनीने या नव्या गाईडलाइन्सची अंमबजावणीचे काम सुरु केले आहे.
मटौर ते शिमला फोरलेन प्रोजेक्ट अंतर्गत ट्विन चनलचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करत असलेल्या कंपनीने मे २०२३ मध्ये गजरहेड ते समेलाच्या पुढे बोगद्याचो दोन्ही टोके जोडण्याचे काम सुरू केले आहे. बोगद्याचे खोदकाम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मजूर दोन शिफ्टमध्ये काम करत आहेत.
नुकतेच उत्तरकाशी मध्ये सिल्क्यारा येथे बोगद्यात अपघात झाला असून बोगद्याचा एक भाग कोसळल्याने तब्बल ४१ मजूर मागील १३ दिवसांपासून अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी बोगद्यात पाईप लाईन टाकून प्रयत्न केले जात आहेत. या दुर्घटनेतून धडा घेतल्यानंतर एनएचएआयने सतर्कता दाखवत नवीन अॅडव्हायजरी जारी केली आहे. कंपनी आता बोगद्याचे उत्खनन तसेच कोणत्याही संभाव्य धोक्याचा किंवा अपघाताचा सामना करण्यासाठी मदत आणि बचाव कार्यासाठी पाईप टाकण्याचे काम केले जाणार आहे.
सध्या प्रस्तावित बोगद्याची लांबी फारशी नाही. परंतु, बोगद्याचे खोदकाम जसजसे होत जाईल, तसतसे त्याच्या बाजूने १५० मिमी पाइप टाकण्यात येईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत याद्वारे बोगद्याच्या आत अन्न किंवा इतर साहित्य वाहून नेले जाऊ शकते. गरज पडल्यास इतर मदत आणि बचाव कार्यही करता येईल. बोगद्याच्या वर संपूर्ण एक्झॉस्ट व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत, गुदमरणे किंवा उडणारी धुळीची समस्या हाताळता येईल. नजीकच्या रुग्णालयात सर्व आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका स्टँडबाय ठेवण्याबाबतही माहिती देण्यात आली आहे.
कांगडा येथे फोरलेन अंतर्गक कांगडा येथे बांधल्या जात असलेल्या ट्विन टनलच्या बांधकामासाठी १२४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ६३० मीटर लांबीची ही ट्विन टनल डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बोगदा प्रकल्पांतर्गत दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत. वाहने एका मार्गाने कांगडा येथे येतील आणि दुसऱ्या मार्गाने कांगड्यातून बाहेर पडतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.