देश

'घाई करु नका,नाहीतर..', बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी लागणार आणखी एक महिना? आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा अंदाज

बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी एक महिना लागू शकतो, अशी भीती अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी शनिवारी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Uttarkashi Tunnel Collapse Rescue: सिल्क्यारा बोगद्यातून मजुरांची सुटका करण्यासाठी ऑगर यंत्राद्वारे खोदकाम करताना अनेक अडथळे येत असल्याने मजुरांच्या सुटकेसाठी विलंब होत आहे. या पार्श्‍वभूमीवर तज्ज्ञ विविध अंदाज व्यक्त करीत आहेत.बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी एक महिना लागू शकतो, अशी भीती अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी शनिवारी व्यक्त केली आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की २५ डिसेंबरपर्यंत मजूर घरी जाऊ शकतील. सर्व जण सुरक्षित आहेत. बचावकार्यात घाई केली तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगून बोगद्यात बचाव मोहीम सुरू आहे. लंबरेषेत खोदकाम करणे हे वेळखाऊ असून अतिशय अवघड आहे. बोगद्याच्या छताच्या वर उपलब्ध असलेल्या अरुंद जागेमुळे अधिक अचूकता आणि सावधगिरीची गरज असल्याचे डिक्स यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

मजूर १२ नोव्हेंबरपासून बोगद्यात

उत्तरकाशी जिल्ह्यापासून ३० किलोमीटरवर दूर सिल्क्यारा बोगद्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम ‘ऑल वेदर रोड’ प्रकल्पाचा हा एक भाग आहे. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधल्या जाणाऱ्या या बोगद्याची लांबी ४.५ किलोमीटर आहे.

१२ नोव्हेंबरला त्याचा एक हिस्सा कोसळला होता. यामुळे काम करणारे मजूर आत अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी गेल्या १२ दिवसांपासून बचाव मोहीम सुरू आहे. पण अद्याप यश आलेले नाही. (Latest Marathi News)

बोगद्यात आठ राज्यांमधील मजूर

४१-एकूण मजूर

२ -उत्तराखंड

१-हिमाचल प्रदेश

८-उत्तर प्रदेश

५-बिहार

३-पश्चिम बंगाल

२-आसाम

१५- झारखंड

५-ओडिशा (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT