Uttarkashi Tunnel Collapse Esakal
देश

Uttarkashi Tunnel Collapse: ४१ मजुरांचे जीव वाचवण्यासाठी उंदरांचे टेक्निक वापरुन फोडणार पहाड! काय आहे 'रॅट माइनिंग'

उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्यात अनेक प्रकारचे अडथळेही समोर येत आहेत. आता बोगद्यावर उभ्या खोदकामालाही सुरुवात झाली असून ३० मीटरपेक्षा जास्त खोदकाम पूर्ण झाले आहे. त्याच वेळी, 48 मीटर वरून ड्रिलिंग दरम्यान, बोगद्याच्या आत टाकलेल्या पाईपमध्ये अडकलेल्या ऑगर मशीनला प्लाझ्मा कटरने कापून पूर्णपणे बाहेर काढण्यात आले आहे.

आता या ड्रिलिंगमध्ये 48 मीटरच्या पुढे खोदकाम हाताने केले जाणार आहे. यासाठी 6 'रैट माइनर्स' पथकाला सिल्क्यारा येथे पाचारण करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

उंदीर खाण कामगार आता सिल्क्यारा बोगद्यात हाताने खोदणार

या 'रैट माइनर्स' कामगारांना दिल्ली आणि अहमदाबादमध्ये अशा प्रकारचे काम करण्याचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, 'आम्ही एकाच समाजाचे आहोत, आम्ही सर्वजण मजूर आहोत, बोगद्यात अडकलेलेही मजूर आहेत. आम्हाला त्या ४१ कामगारांना बाहेर काढायचे आहे. आम्ही देखील कधीतरी असेच अडकू शकतो, तेव्हा ते देखील आम्हाला मदत करतील. या खाण कामगारांनी सांगितले की, आम्हाला अशा कामाचा अनुभव आहे, आम्ही अनेक वर्षांपासून हे काम करत आहोत. आपण हे करू शकतो असा आत्मविश्वास आम्हाला आहे.

'रैट माइनर्स' एकावेळी 6 ते 7 किलो मलबा बाहेर काढतील

या कामाची माहिती देताना रॅट मायनर्स म्हणाले की, पहिले दोन लोक पाईपलाईनमध्ये जातील, एक पुढे रस्ता बनवेल आणि दुसरा ट्रॉलीमध्ये मलबा भरेल. बाहेर उभे असलेले चार लोक पाईपच्या आतून मलबा असलेली ट्रॉली बाहेर काढतील. एका वेळी 6 ते 7 किलो मलबा बाहेर काढला जाईल. मग आतील दोन लोक थकल्यावर बाहेरून दोन लोक पाइपलाइनमध्ये जातील. त्याचप्रमाणे एक एक करून काम केले जाईल. त्याचवेळी बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सत्तूचे लाडू, दलिया, जाम, ब्रेड आणि उकडलेली अंडी यांची ४१ पाकिटे आज देण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

वरील बाजूने ड्रिलिंग सुरू, 30 मीटरपेक्षा जास्त खोदकाम पुर्ण

बीआरओचे डीजी लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी सांगितले की, ऑगर मशिनच्या ब्लेडचे तुकडे पाइपलाइनमधून बाहेर काढण्यात आले आहेत. दीड मीटर खराब झालेले पाइप बदलण्यात येत आहेत. ढिगारा साफ केल्यानंतर, रॅट मायनर्स आणि लष्कराच्या मदतीने मॅन्युअल ड्रिलिंग सुरू करण्यात येईल.

हा सर्वात वेगवान मार्ग असेल. रॅट मायनर्स प्लाझ्मा कटर किंवा पारंपारिक पद्धतीने मॅन्युअल ड्रिलिंग करतील. ते पुढे म्हणाले की, 31 मीटरपर्यंत उभ्या खोदकाम करण्यात आले असून 200 मिमी व्यासाचे पाइप 70 मीटरपर्यंत पोहोचले आहेत. सैन्य येथे फक्त मदतीसाठी आहे. आम्ही एका वेळी सुमारे एक मीटर मॅन्युअल ड्रिलिंगची योजना करत आहोत.

रैट माइनिंग म्हणजे काय, ते कसे कार्य करते?

जेव्हा जागा फारच अरुंद असते आणि मोठी मशीन किंवा इतर ड्रिलिंग उपकरणे त्याठिकाणी नेणे शक्य नसते तेव्हा रैट माइनिंगचा अवलंब केला जातो. यामध्ये मानव हाताने खोदतो. मानव एका छोट्या जागेत हळूहळू खोदकाम करत असल्याने त्याला 'रैट माइनिंग' असे नाव देण्यात आले आहे. कोळसा खाणीमध्ये या पध्दतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. खासकरून ज्या ठिकाणी अवैध खोदकाम केले जाते त्या ठिकाणी या पध्दतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

विशेषत: ज्या भागात बेकायदेशीर उत्खनन होते. मशिन आणि इतर उपकरणे असल्यामुळे लोकांच्या आणि प्रशासनाच्या सहज लक्षात येऊ शकतात, त्यामुळे कोळसा खाणींमध्ये छुप्या पद्धतीने मानवाकडून 'रैट माइनिंग' केले जातात, जेणेकरून कोणालाही याचा सुगावा लागू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT