Uttarkashi Tunnel Rescue 
देश

Uttarkashi Tunnel Rescue: मजुरांना वाचवण्यासाठी लष्कराची अभियंता तुकडी दाखल; दोन आठवड्यांनंतरही अथक संघर्ष सुरूच...

सकाळ वृत्तसेवा

उत्तरकाशी, ता. २६ (पीटीआय): उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्याचा भाग कोसळून अडकलेल्या ४१ मजुरांच्या सुटकेसाठी दोन आठवड्यांनंतरही अथक संघर्ष सुरू आहे. बचाव व मदत कार्यात अनेक अडथळे उभे राहत आहेत. बोगद्यात कोसळलेल्या ढिगाऱ्यात अमेरिकी ऑगर हे यंत्र अडकून बसल्याने नवे आव्हान उभे राहिले. या यंत्राचे ढिगाऱ्यात अडकलेले भाग काढण्यासाठी हैदराबादवरून हवाईमार्गे प्लाझमा कटर आणण्यात आले.

बोगद्यात मजुरांच्या सुटकेसाठी पाईप टाकून मार्ग तयार करण्यात येत असून ढिगाऱ्यात अडकलेले अमेरिकी यंत्र पूर्णपणे मोकळे केल्याशिवाय हे काम पुढे सरकणार नाही. दरम्यान, या बचावकार्यात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने टेकडीवरून लंबरेषेत खोदकाम करण्यासाठीही यंत्र टेकडीवर पाठविण्यात आले आहे. दरम्यान, लष्कराची ‘मद्रास सॅपर्स’ ही अभियंता तुकडीही घटनास्थळी दाखल झाली. (Latest Marathi News)

या बचाव मोहिमेला उशीर लागत असला तरी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी मात्र आतापर्यंतच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की हैदराबादेवरून आणलेल्या प्लाझ्मा कटरने ऑगर यंत्राच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या भागांचा वेग वाढविला आहे. हे यंत्र ढिगाऱ्यातून पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. बोगद्यात जमिनीला समांतर दिशेने पाईप टाकून मजुरांच्या सुटकेसाठी मार्ग तयार करण्यात वारंवार अडथळे निर्माण होत असल्याने आता टेकडीवरून लंबरेषेत खोदकाम केले जाणार आहे. त्यासाठी, खडकांची रचना जाणून घेण्यासाठी चाचण्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

शुक्रवारी (ता.२४) रात्री मदत व बचावकार्य सुरू असताना ऑगर यंत्राचे पाते ढिगाऱ्यात अडकल्याने इतर पर्यायांवर विचार करणे अधिकाऱ्यांना भाग पडले. मात्र, त्यामुळे अवघ्या काही तासांत मजुरांची सुटका होण्याच्या आशेवर पाणी पडले. टेकडीवर लंबरेषेत खोदकाम करण्यासारख्या पर्यायामुळे या मजुरांच्या सुटकेला आणखी काही दिवस किंवा काही आठवडेही लागू शकतात.

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या मार्गावरील हा बांधकाम सुरू असलेला बोगदा १२ नोव्हेंबरला कोसळून ४१ कामगार आत अडकले. बोगद्याच्या बांधकाम पूर्ण झालेल्या दोन कि.मी.च्या पट्ट्यात हे कामगार असून त्यांना सहा इंच रुंदीच्या पाईपमधून अन्न, औषधे आदी पाठविले जात आहे.

दोन पर्यायांवर विचार

सिल्क्यारा बोगद्यात अनेक संस्थांकडून मदत व बचावकार्य राबविले जात असून अधिकाऱ्यांनी आता दोन पर्यायांवर लक्ष केंद्रित केले आहे. बोगद्यात १४ दिवसांपासून सुरू असलेले पाईप टाकण्याचे काम आता अखेरच्या टप्प्यात असून केवळ १० ते १२ मीटरचे अंतर शिल्लक आहे. मात्र, यंत्राद्वारे खोदकाम करण्यात अडचणी येत असल्याने उर्वरित खोदकाम हाताने करण्याचा पर्याय आहे. त्याचप्रमाणे, टेकडीवरून ८६ मीटर लंबरेषेत खोदकाम करण्याचा दुसरा पर्यायही आहे. मात्र, लंबरेषेतील खोदकामाच्या पर्यायावर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govinda Gun Fire: अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, पायाला लागली गोळी; घरात पहाटे काय घडलं?

Pakistani Living in India : 'शर्मा नव्हे सिद्दीकी', कित्येक वर्षांपासून भारतात राहत होतं पाकिस्तानी कुटुंब; असा झाला भांडाफोड

AIMIM Maharashtra: विधानसभेसाठी 'एमआयएम'ला सापडेना मित्र पक्ष; महाविकास अन् तिसरी आघाडीही सोबत घेईना

Share Market Today: कालच्या घसरणीनंतर आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Laxman Hake Viral Video : हाकेंनी खरंच दारू घेतली होती का? प्राथमिक वैद्यकीय अहवालातून आलं समोर

SCROLL FOR NEXT