Uttarkashi Tunnel Rescue Esakal
देश

Uttarkashi Tunnel Rescue: अजूनही सुटका नाहीच! मशीन ठरल्या निकामी, आता मजूर स्वतःच करणार प्रयत्न? दोन योजनांवर विचार सुरू

गुरुवारी दुपारी चार वाजता बेस हलल्यामुळे ऑगर मशीन बंद झाले होते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी २४ तासांनंतर अमेरिकन ऑगर मशीन सुरू झाली, मात्र दीड मीटर पुढे गेल्यावर लोखंडी अडथळ्यामुळे ते मजुरांपासून नऊ मीटर अंतरावर थांबलं आहे. यानंतर अडथळे दुर करण्याचे काम सुरू झाले, मात्र अडकलेल्या कामगारांनी आतून नऊ मीटरचा मलबा काढायचा, असाही विचार सुरू झाला. किंवा दुसरा विचार चालू आहे तो म्हणजे ऑगर मशीन वापरण्याऐवजी मनुष्यबळाचा वापर करून मलबा हटवणे.

गुरुवारी दुपारी चार वाजता बेस हलल्यामुळे ऑगर मशीन बंद झाले होते. सुमारे 24 तासांच्या दुरुस्ती आदींनंतर शुक्रवारी 13 तारखेला दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मशिन चालू लागल्यावर पुन्हा आशा पल्लवित झाल्या. मात्र काही वेळाने बचाव पथकांना पुन्हा धक्का बसला.

एनएचआयडीसीएलचे महाव्यवस्थापक कर्नल दीपक पाटील यांनी सांगितले की, संध्याकाळी 6.40 च्या सुमारास मशिनच्या मार्गात लोखंडी अडथळे निर्माण झाल्याने पुन्हा काम थांबले. आतापर्यंत केवळ 47 मीटर पाईपच ढिगाऱ्यापर्यंत पोहोचू शकले आहेत.

गेल्या 24 तासात काय घडलं?

गुरुवारी

सकाळी 8 : रात्रीपासून बंद पडलेले मशिन सुरू करण्याची तयारी सुरू झाली.

सकाळी 9: ड्रिल मशीन पुन्हा सुरू करण्यात आले.

दुपारी 4: पुन्हा मशीनसमोर अडथळा निर्माण झाला. 800 मिमीचा पाइपही समोरून वाकला. मशिनचा बेस म्हणजेच प्लॅटफॉर्मही हलला. परिणामी खोदकाम थांबवावे लागले.

रात्री 11: ट्रेंचलेस कंपनीचे अभियंते प्रवीण यादव आणि बलविंदर मशीनमध्ये घुसले. सुमारे आठ तास त्यांनी रीबार आणि 800 मिमी वाकलेला पाइप कापून बाहेर काढला.

रात्री 12: ऑगर मशीनच्या प्लॅटफॉर्मच्या मजबुतीकरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT