Uttarkashi Tunnel Rescue: उत्तराखंड येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आठव्या दिवशी देखील प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने देखील या घटनेकडे लक्ष घातले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज घचनास्थळी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दोन ते अडीच दिवसांत कामगारांपर्यंत पोहचणार असल्याचे सांगितले.
नितीन गडकरी म्हणाले, "गेल्या 7-8 दिवसांपासून आम्ही कामगारांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. त्यांना बाहेर काढणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. येथे काम करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत मी 2 तास बैठक घेतली. आम्ही 6 पर्यायी उपाययोजनांवर काम करत आहोत आणि भारत सरकारच्या विविध एजन्सी येथे कार्यरत आहेत. पंतप्रधान कार्यालय सुद्धा यावर विशेष लक्ष ठेऊन आहे. बोगदा तज्ज्ञ आणि BRO अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. सध्या आमची प्राथमिकता अडकलेल्यांना अन्न, औषध आणि ऑक्सिजन पुरवणे आहे."
"बीआरओकडून खास मशीन आणून रस्ते तयार केले जात आहेत. अनेक यंत्रे येथे आली आहेत. बचावकार्यासाठी सध्या दोन बोअरिंग मशीन कार्यरत आहेत. ऑगर मशीनने योग्य प्रकारे काम केले तर येत्या दोन ते अडीच दिवसांत आम्ही अडकलेल्या मजुरांपर्यंत पोहोचू शकू", अशी आशा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या सिल्क्यरा बोगद्याचा एक भाग १२ नोव्हेंबरला सकाळी कोसळला होता, त्यामुळे ४१ कामगार त्यात अडकले होते. जसजसा वेळ जात आहे, तसतशी बोगद्याबाहेर थांबलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांमध्ये निराशा वाढत आहे. (Latest Marathi News)
ढिगारा खोदून त्यात पाईप टाकून मार्ग तयार करण्यासाठी आणलेल्या शक्तिशाली अमेरिकन आगर मशिनमध्ये काही बिघाड झाल्याने कामगार कुटुंबीयांची अस्वस्थता वाढू लागली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.