Uttarkashi Tunnel Rescue Esakal
देश

Uttarkashi Tunnel Rescue: CM धामींनंतर आता इंटरनॅशनल टनेलिंग एक्सपर्टही बसले 'बाबा बोखनाग'च्या पूजेला; गावकरी म्हणतात बोगदा दुर्घटना 'दैवी कोप'

बोगद्याच्या अगदी वरच्या जंगलात बौख नाग देवतेचे मंदिर आहे. कंपनीने जंगलांना त्रास देत बोगदा बांधण्यास सुरुवात केली आणि त्या बदल्यात कंपनीने बोगद्याजवळ देवतेचे मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते, परंतु 2019 पासून अद्याप मंदिर बांधले गेले नाही. याबाबत अनेकदा लोकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आठवण करून दिली, मात्र अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील बांधकामाधीन सिल्क्यारा बोगद्याचा काही भाग कोसळल्याने मजूर अडकून १७ दिवस झाले आहेत. मात्र अद्याप आत अडकलेल्या ४१ मजुरांची सुटका करण्यात यश आलेले नाही. बचाव कार्य पथकाचे प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत.

तर बोगद्याच्या अगदी वरच्या जंगलात बौख नाग देवतेचे मंदिर आहे. कंपनीने जंगलांना त्रास देत बोगदा बांधण्यास सुरुवात केली आणि त्या बदल्यात कंपनीने बोगद्याजवळ देवतेचे मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते, परंतु 2019 पासून अद्याप मंदिर बांधले गेले नाही. याबाबत अनेकदा लोकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आठवण करून दिली, मात्र अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे हा दैवी कोप असल्याचे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तर या घटनेनंतर घटनास्थळी आलेल्या मुख्यमंत्री धामी यांनी या बौख नाग देवतेचे दर्शन घेतले होते, त्यानंतर आता इंटरनॅशनल टनेलिंग एक्सपर्टनेही या देवतेचे दर्शन घेतल्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

(Latest Marathi News)

बचावाच्या पहिल्या दिवसापासून अपयश:-

प्लॅन ए- जेसीबी मशीन आणि पोकलेनच्या साहाय्याने बोगदा खोदण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो प्रयत्न फसला.

प्लॅन बी- सॉफ्ट कटिंग मशीन ऑर्डर केले जे तांत्रिक बिघाडामुळे काम करू शकले नाही.

प्लॅन C- आणखी एक नवीन 'ऑगर ड्रिलिंग मशीन' चिन्यालिसौर हवाई पट्टीवर 'वायुसेना' जहाजांमधून एअर लिफ्ट करण्यात आले, परंतु ते देखील अयशस्वी झाले.

प्लॅन डी- आता रेस्क्यू टीम रॅट होल मायनिंगचा अवलंब करत आहेत. रैट होल माइनिंग करणाऱ्या संघांनी ऑगर मशीन जिथे बंद झाले तेथून मॅन्युअल ड्रिलिंग सुरू केले आहे.

प्लॅन ई- बोगद्याच्या वरील बाजून व्हर्टिकल ड्रिलिंग देखील केले जात आहे. त्यात 1 मीटर रुंद पाइप टाकण्यात येत आहे. याच्या मदतीने कामगारांना वर खेचले जाईल

एनएचआयडीसीएलचे संचालक डॉ अंशू मनीष खालको यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बोगद्याच्या आतील मशिनच्या कंपनामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे, जेणेकरून पुढील ढिगारा खाली पडू नये. मशीनला थोडा वेळा बंद ठेवण्याच्या उद्देशाने कामही बंद करण्यात आले आहे.(Latest Marathi News)

स्थानिक लोक या अपघाताला त्यांचे इष्ट देवता, भगवान बौख, सर्पदेवाचा कोप मानत आहेत. कंपनीने देवाचे मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले पण ते बांधले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यासोबतच गावकऱ्यांनी बांधलेले छोटे मंदिरही पाडण्यात आले. त्यानंतरच हा अपघात झाला. हा देवाचा कोप आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. (Marathi Tajya Batmya)

मंदिर बांधण्याचे आश्वासन कंपनीने पाळले नाही

स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, हा अपघात म्हणजे भगवान बौख नागाचा कोप आहे. बोगद्याच्या अगदी वरच्या जंगलात बौख नाग देवतेचे मंदिर आहे. कंपनीने जंगलांना त्रास देत बोगदा बांधण्यास सुरुवात केली आणि त्या बदल्यात कंपनीने बोगद्याजवळ देवतेचे मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते, परंतु 2019 पासून अद्याप मंदिर बांधले गेले नाही. याबाबत अनेकदा लोकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आठवण करून दिली, मात्र अधिकाऱ्यांनी मंदीर बांधण्याची गोष्ट गांभीर्याने घेतली नाही.याउलट बोगद्याच्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी बांधलेले छोटे मंदिरही पाडण्यात आले. यानंतर बोगद्यात अपघात झाला. हा देवाचा कोप असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. (Marathi Tajya Batmya)

आता सीएम धामीपासून परदेशी तज्ज्ञांपर्यंत सर्वांनी केली पूजा

आता सर्व बाजूंनी पराभव स्वीकारत रैट मायनर्संनी हाताने खोदकाम सुरू केले आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता केवळ काही मीटर खोदाई करावी लागणार आहे. तत्पूर्वी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि परदेशातून आलेले आंतरराष्ट्रीय टनेलिंग तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी बाबा बौखनागची पूजा केली.

सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुजाऱ्याला पाचारण करण्यात आले. स्थानिक देवतेच्या तात्पुरत्या मंदिराबाहेर पूजा करण्यात आली. ग्रामस्थांच्या आरोपानंतर आठवडाभरापूर्वीच मंदिर बांधण्यात आले. बोगद्याच्या बांधकामादरम्यान मंदिर हटवण्यात आले होते.

त्याचबरोबर जर आपण सिद्धपीठ धरी देवीबद्दल बोललो, तर या मंदिराला देखील खूप प्रामाणिक इतिहास आहे. हे मंदिर श्रीनगर गढवालपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर अलकनंदा नदीच्या काठावर वसले होते. श्रीनगर जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीनंतर हा परिसर पाण्याखाली येत होता.

त्यासाठी प्रकल्प चालविणाऱ्या कंपनीकडून त्याच ठिकाणी खांब उभारून मंदिराचे बांधकाम करण्यात येत होते, मात्र जून २०१३ मध्ये केदारनाथ महापुरामुळे अलकनंदा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने मूर्ती (धारी देवी, भैरवनाथ आणि नंदी) नष्ट करण्यात आले.त्याचे उत्थान करण्यात आले.नऊ वर्षांपासून या तात्पुरत्या जागेत मूर्ती बसल्या आहेत.

असे मानले जाते की जलविद्युत प्रकल्पासाठी अलकनंदावर धरण बांधले जात होते. येथे श्रीनगरपासून 14 किमी अंतरावर असलेले सिद्धपीठ धारी देवीचे मंदिर जलमग्न क्षेत्राखाली येत होते. प्रकल्प कंपनीने धरणी देवी मंदिरापासून मूर्तीचे उत्थान करण्याचा निर्णय घेतला.

गढवालच्या लोकांनी याचा निषेध केला आणि त्याला विनाशकारी म्हटले, परंतु कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही आणि 16 जून 2013 रोजी धारी देवीच्या मूर्तीचे उत्थान करण्यात आले.त्याच दिवशी केदारनाथमध्ये पूर आला आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला. गढवालचे लोक या विनाशकारी आपत्तीसाठी प्रकल्प कंपनीला जबाबदार धरतात आणि पूर हा धारी देवीचा कोप मानला जातो. याचा पुरावा तत्कालीन खासदार सुषमा स्वराज यांनी सभागृहातील भाषणात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT