अमेठी (उत्तर प्रदेश) : अमेठी लोकसभा मतदारसंघाची कौटुंबिक नाते असल्याचा दावा करणाऱ्यांनी संसदेत या मतदारसंघाच्या समस्या कधीच मांडल्या नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली. इराणी यांनी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबीयांचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव केला होता.
अमेठीतील तिलोई परिसरातील बस स्थानकासह पाच कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन इराणी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी, त्या बोलत होत्या. इराणी म्हणाल्या, की अमेठीला वर्षानुवर्षे विविध समस्या भेडसावत आहेत. मात्र, या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराने मौन पत्करले. अमेठीशी कौटुंबिक नाते असल्याचा दावा करणाऱ्यांनी संसदेत या मतदारसंघाच्या समस्या कधीही मांडल्या नाहीत. त्यामुळे, अमेठीवासियांना वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहावे लागले, असा आरोपही त्यांनी केला.
अमेठी लोकसभा मतदारसंघात तिलोई, सालोन, जगदीशपूर, गौरीगंज आणि अमेठी या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. उत्तर प्रदेशात २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघांत विजय मिळविला होता. समाजवादी पक्ष एका जागेवर विजयी झाला. आता, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे.
आठ महिन्यांत अमेठीत बस स्थानक
उत्तर प्रदेशात विकासकामे करण्याचा योगी आदित्यनाथ सरकारच्या दृष्टिकोनामुळे अवघ्या नऊ महिन्यांत अमेठीतील तिलोईतील बस स्थानक तयार झाल्याचा दावाही त्यांनी केला. तिलोईत वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात असून कोरोनाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारल्याचेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.