भुवनेश्वर - कोरोनावरील लसीकरणाला ओडिशात शनिवारपासून सुरुवात झाली असली तरी रविवारी (ता.१७) ही मोहीम देशभरात स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त सचिव प्रदीप्ता कुमार मोहपात्रा यांनी काल दिली.
ते म्हणाले, ‘‘ पहिल्या टप्प्यात ज्या आरोग्यसेवकांना लस दिली आहे, त्यांच्यावर काय परिणाम होतात, याचे निरीक्षण उद्या एक दिवस करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम सोमवार (ता.१८)पासून लसीकरण सुरळीत पार पडेल. भुवनेश्वरमधील कॅपिटल रुग्णालयात काल सकाळी ११च्या सुमारास लसीकरणाला सुरुवात झाली. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी बिरंची नायक (वय ५१) याला सर्वांत प्रथम लस टोचण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचे संचालक आणि डॉक्टरांनी डोस घेतला.
राज्यात १६१ ठिकाणी लसीकरणाला आज सुरुवात झाली. प्रत्येक ठिकाणी १०० आरोग्यसेवकांना असे एकूण १६ हजार १०० जणांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात येत्या २५ पर्यंत उर्वरित आरोग्य सेवकांसह पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या सर्वांची माहिती ‘कोविन’ पोर्टलवर सादर करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.