Gyanvapi Survey Varanasi in Uttar Pradesh esakal
देश

Gyanvapi Mosque Survey : 'ज्ञानवापी'त दुसऱ्या दिवसाच्या सर्वेक्षणाला सुरुवात; ASI च्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा, जाणून घ्या काय सापडलं

सर्वोच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ज्ञानवापीमध्ये सुरु झालं एएसआयचं सर्वेक्षण

सकाळ डिजिटल टीम

ज्ञानवापीची पश्चिमेकडील भिंत आणि त्यावरील आकृत्या सध्याच्या इमारतीच्या रचनेशी कोणत्याही प्रकारे जुळत नाहीयेत. ही भिंत हिंदू मंदिरांमध्ये सापडलेल्या कलाकृतींनी भरलेली आहे.

वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसीत (Varanasi in Uttar Pradesh) सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्व विभागाचं सर्वेक्षण सुरू आहे. काल शुक्रवारपासून सुरू झालेलं सर्वेक्षण आता आज शनिवारी पुन्हा एकदा सुरू झालं आहे.

आज (शनिवार) पुन्हा एकदा एएसआयची टीम (ASI Team) सर्वेक्षणासाठी पोहोचली असून सकाळी नऊ वाजता सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. हिंदू पक्षाचे वकील सुधीर त्रिपाठी यांनी सांगितलं की, आज सकाळी ९ वाजता सर्वेक्षण सुरू झालं आहे. सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

लोकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही पूर्ण सहकार्य आणि सहभाग दर्शवत आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण केले जात आहेत. हे प्रकरण लवकर निकाली निघावं, अशी आमची इच्छा आहे. सर्वेक्षणातून सर्व काही स्पष्ट होईल, असंही वकिलांनी सांगितलं.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, एएसआयचं पथक सर्वेक्षणासाठी शुक्रवारी ज्ञानवापी इथं पोहोचलं. कालचा दिवस खूप खास होता. वाराणसीमध्ये हाय अलर्ट असताना पहिल्या दिवसाचं सर्वेक्षण शुक्रवारी पूर्ण झालं. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं मुस्लिम बाजूचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. यासोबतच एएसआयच्या सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर ज्ञानवापीमध्ये एएसआयचं सर्वेक्षण सुरू आहे.

एएसआयच्या चार पथकांनी केलं सर्वेक्षण

एएसआयनं सर्वेक्षणासाठी चार टीम तयार केल्या आहेत. दोन पथकांनी संकुलाच्या पश्चिमेकडील भिंतीची तपासणी सुरू केली. एक पथक पूर्वेकडील भिंत, तर दुसरी उत्तरेकडील भिंत आणि त्याच्या लगतच्या भागात तपासासाठी नियुक्त करण्यात आली होती. काल सायंकाळी पाच वाजता सर्वेक्षण थांबवण्यात आलं. 33 सदस्यीय टीमचं नेतृत्व एडीजी आलोक त्रिपाठी, अतिरिक्त महासंचालक यांनी केलं. टीममध्ये तज्ञांसह GPR हँडलर यंत्र आहे.

ज्ञानवापीची पश्चिमेकडील भिंत आणि त्यावरील आकृत्या सध्याच्या इमारतीच्या रचनेशी कोणत्याही प्रकारे जुळत नाहीयेत. ही भिंत हिंदू मंदिरांमध्ये सापडलेल्या कलाकृतींनी भरलेली आहे. हत्तीच्या सोंडेच्या आकाराचं चिन्ह सापडलं आहे. त्यावर नक्षीकाम, स्वस्तिक, कलशफूल, कमळाची फुलं इत्यादींच्या आकृत्याही आहेत. मंदिराच्या बाजूनुसार, पश्चिमेकडील भिंत हे माँ शृंगार गौरीच्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे. पहिल्या दिवसाच्या पाहणीत हा पुरावा आढळून आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT