Crime News:
उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका स्थानिक गुंडाने पाणीपुरी विक्रेत्याची हत्या केली. यासाठी कारण देखील किरकोळ होतं. स्थानिक गुंड आणि त्याच्या चार साथीदारांना मोफत पाणीपुरी नाकारण्यात दिली नाही म्हणून विक्रत्याची हत्या करण्यात आली.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ४० वर्षीय प्रेम चंद्र हा माणूस रविवारी संध्याकाळी घरी परतत होता तेव्हा एका स्थानिक गुंड धीरज आणि त्याच्यासोबतच्या काहींनी विक्रेत्याकडून मोफत पाणीपुरी मागितली. प्रेमचंद यांनी पाच लोकांना मोफत पाणीपुरी देण्यास विरोध केला. यानंतर गुंडानी शिवीगाळ केली. त्यानंतर हे प्रकरण वाढले.
गुंडानी पाणीपुरी व्रिक्रेत्याला मारहाण केली. स्थानिक लोकांनी मध्यस्थी केली आणि प्रेमचंद यांना वाचवले. मात्र रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. (Crime News)
"शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. मृतदेह शवविच्छेदनाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि इतर आवश्यक निष्कर्षांच्या आधारे कारवाई केली जाईल," असे चकेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक कुमार दुबे यांनी सांगितले होते.
प्रेमचंद्र हे कानपूर देहाटचे रहिवासी होते आणि चकेरी येथे पत्नी आणि मुलांसह राहत होते. ही घटना १७ (जानेवारी) तारखेला घडली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.