नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना महात्मा गांधी यांच्याशी केल्यानं त्यांना मोठ्या टिकेला सामोरं जावं लागत आहे. काँग्रेसनंही धनखड यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली असून हे विधान लाजीरवाणं असल्याचं म्हटलं आहे. (Vice President Jagdeep Dankhad compares PM Modi to Mahatma Gandhi Congress says shameful)
जैन तत्वज्ञ श्रीमद राजचंद्राजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोमवारी आयोजित एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड बोलत होते. ते म्हणाले, "मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, महात्मा गांधी हे गेल्या शतकातील 'महापुरुष' होते. (Latest Marathi News)
तर नरेंद्र मोदी हे या शतकातील 'युगपुरुष' आहेत. गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या जोरावर आपल्याला ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त केलं. तर पंतप्रधान मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेलं आहे जे आपल्याला कायमचं हवं होतं. महात्मा गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये श्रीमद राजचंद्रजी यांची शिकवण दिसून येते" (Marathi Tajya Batmya)
उपराष्ट्रपतींनी केलेल्या या विधानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला असून हे लाजीरवानं असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते माणिकम टागोर यांनी आपल्या ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं की, जर तुम्ही पंतप्रधान मोदींची तुलना गांधीजींशी करत असाल तर हे लाजीरवानं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की तुलना करायला पण एक मर्यादा असते, तुम्ही ती ओलांडली आहे. (Latest Marathi News)
दुसरीकडं समाजवादी पार्टीचे खासदार दानिश अली यांनी म्हटलं की, मला आश्चर्य वाटतंय की, आपल्याकडं नवं युग सुरु झालंय ज्यामध्ये संसदेत पंतप्रधानांच्या पक्षाच्या खासदारांना एका विशिष्ट समाजाविरोधात शिवीगाळ करण्याला परवानगी दिली जाते. भाजप खासदार रमेश भिदुरी यांनी दानिश अली यांना केलेल्या शिवीगाळ प्रकरणावरुन त्यांनी हा टोला लगावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.