Vice Presidential Election Vice Presidential Election
देश

Vice Presidential Election : भाजपला नाही कोणाच्या पाठिंब्याची गरज!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Vice Presidential Election ) भाजपला मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार जिंकण्यासाठी भाजपकडे पुरेशी मते आहेत. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत नामनिर्देशित खासदारांसह केवळ लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनाच मतदान करता येत असल्याने हे शक्य झाले आहे. या निवडणुकीत लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २३२ खासदार मतदान करतात.

१ जुलै रोजी वरिष्ठ सभागृहात त्यांचे संख्याबळ ९२ खासदारांवर आले आहे. लोकसभेत भाजप आणि एनडीएकडे प्रचंड बहुमत आहे. पोटनिवडणुकीत भाजपने (BJP) दोन जागा जिंकल्या आहेत. यासह लोकसभेतील भाजपच्या खासदारांची संख्या ३०३ वर पोहोचली आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडे एकूण ३९५ खासदार आहेत, जी जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या ३८८ पेक्षा सातने अधिक आहेत.

निवडणूक आयोगाने २०२२ च्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी (Vice Presidential Election) अधिसूचना जारी केली आहे. ६ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. नवे उपसभापती आगामी पावसाळी अधिवेशनात पदभार स्वीकारतील आणि वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्षपद भूषवतील.

राष्ट्रपती निवडणुकीत मित्रपक्ष आणि इतर पक्षांची गरज

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Vice Presidential Election) सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या जवळपास १ टक्के कमी आहे. एकट्या भाजपकडे ४२ टक्के पेक्षा जास्त मते आहेत. तथापि, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (सुमारे ३ टक्के मते), जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष (४ टक्के मते) आणि अकाली दल (०.१६ टक्के मते) यांनी पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. यामुळे एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

उमेदवार अद्याप जाहीर नाही

एनडीए आणि विरोधी पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत. विरोधी पक्षनेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, संभाव्य नावावर लवकरच अंतर्गत चर्चा सुरू होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ जुलै आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamala Harris vs Donald Trump election : डोनाल्ड ट्र्म्प आघाडीवर... पण कमला हरिस यांचा कमबॅक शक्य; अंतिम निकाल कधी लागणार?

Andhari Vidhansabha: ऋतुजा लटके पुन्हा मारणार बाजी की मुरजी पटेल देणार धोबीपछाड? अंधेरी पूर्वेत दोन्ही शिवसेनांमध्ये चुरशीची लढत

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

SCROLL FOR NEXT