Ram Mandir Ayodhya Rahul Gandhi 
देश

Video: एकीकडे प्राणप्रतिष्ठा, तर दुसरीकडे राहुल गांधी रस्त्यावर बसून 'रघुपती राघव राजाराम' का गात आहेत?

Ram Mandir Ayodhya Rahul Gandhi:अयोध्येमध्ये राम लल्लाची प्रतिष्ठापणा होणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची यात्रा सुरु आहे. सध्या त्यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये आली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- अयोध्येमध्ये राम लल्लाची प्रतिष्ठापणा होणार आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची यात्रा सुरु आहे. सध्या त्यांची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये आली आहे. याआधी त्यांची यात्रा मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर होती. राहुल गांधी २२ जानेवारीला बताद्रवामध्ये श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार होते. पण, त्यांना तुर्तास प्रवेश नाकारण्यात आला आहे.

आसाम सरकारने त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले आहे. त्यामुळेच राहुल गांधी, जयराम रमेश आणि इतर काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलन करत आहेत. तसेच ते रघुपती राघव राजाराम गीत गात आहेत. श्रीमंत शंकरदेव मंदिरात दुपारी तीनच्या नंतर त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.(Video Pranapratistha of ram mandir ayodhya Rahul Gandhi on the other side singing Raghupati Raghav Rajaram in aasam)

यासंदर्भात एक व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे. यामध्ये काँग्रेस नेता रघुपती राघव राजा राम गीत गात असताना आणि टाळ्या वाजवताना दिसत आहेत. काँग्रेस नेते आसाम सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. पण, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अधीर रंजन चौधरी यांनी निमंत्रण नाकारलं आहे. भाजप आणि आरएसएसचा हा धार्मिक कार्यक्रम असल्याचं कारण काँग्रेसने दिलं आहे.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी राहुल गांधी यांना श्रीमंत शंकरदेव जन्मस्थळी न जाण्याचा सल्ला दिला आहे. राम मंदिराचे आज लोकार्पण होत आहे. त्याच वेळी राहुल गांधी मंदिरात गेल्यामुळे अंशातता निर्माण होऊ शकते, असं शर्मा यांचं म्हणणं आहे. श्रीमंत शंकरदेव हे एक वैष्णव संत होते.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काही नेत्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. शिवाय मु्ख्यमंत्री शर्मा यांनी राहुल गांधी यांच्या यात्रेदरम्यान कमांडो तैनात करण्यात येतील असं सांगितलं होतं. सध्या आसाममध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT