bjp, congress Esakal
देश

विजयात बरोबरी, मतदानात आघाडी ; कॉंग्रेस भाजपपेक्षा वरचढचं

विधान परिषद निवडणूक : कॉंग्रेसला भाजपपेक्षा ५.९ टक्के मते अधिक

बी. बी. देसाई

बंगळूर : सत्ताधारी भाजप (BJP)आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस (Congress) पक्षाने विधान परिषद निवडणुकीत Vidhan Parishad Election Result) प्रत्येकी ११ जागा जिंकून बरोबरी साधली असली तरी, कॉंग्रेसने भाजपपेक्षा अधिक मते मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, धजदने (JDS)लढलेल्या सहा जागांपैकी फक्त दोनच जागा जिंकूनही त्यांना ४३.१७ टक्के मते मिळाली.

एकूण ९८,७७४ मतांपैकी ९९.७ टक्के मतदान नोंदवले गेले. काँग्रेसला ४४,२२५ मते (४४.७ टक्के) मते मिळाली. भाजप उमेदवारांनी ३८,३९४ मते मिळविली असून त्याची टक्केवारी ३८.८ टक्के आहे. दोन्ही पक्षांनी लढवलेल्या २० जागांवर प्रति मतदारसंघात काँग्रेससाठी सरासरी मते २,२१२ आहेत तर भाजपची सरासरी १,९१९ मतांची आहे.

काँग्रेसने अनेक जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. बेळगाव, हुबळी आणि विजापूर (Belgaum, Hubli and Vijapur) येथे पक्षाचे उमेदवार अनुक्रमे चन्नराज हट्टीहोळी (Channaraj Hattiholi) (३,७१८ मते), सलीम अहमद (३,३३४) आणि सुनीलगौडा पाटील (३,२४५) मते) यांनी आरामात विजय मिळवला. तुमकूरमध्ये पक्षाचा उमेदवार १,०८५ मतांनी विजयी झाला, तर दुहेरी-सदस्य असलेल्या म्हैसूर-चामराजनगर जागेवर ९४६ मतांच्या फरकाने विजय मिळविला.

चिक्कमंगळूरसह भाजपने जिंकलेल्या काही जागांवर विजयाचे अंतर सहा मतांपेक्षा कमी होते. दक्षिण कन्नड-उडुपी दोन सदस्य जागेवर भाजपचे समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांना सर्वाधिक ३,६७२ मते मिळाली. भाजपच्या मतांच्या टक्केवारीवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे मंड्यासारख्या जुन्या म्हैसूर प्रदेशातील उमेदवारांनी खराब कामगिरी केली. त्यांचे उमेदवार बुकनहळ्ळी मंजू यांना केवळ ५० मते मिळाली आणि हसनमध्ये एच. एम. विश्वनाथ यांना ४२१ मते मिळाली.

आमची मतांची टक्केवारी भाजपपेक्षा जास्त आहे. आम्ही चांगल्या फरकाने जिंकलो आणि अनेक जागांवर कमी फरकाने पराभूत झालो, अशी टिप्पणी केपीसीसीचे उपाध्यक्ष प्रा. के.ई. राधाकृष्ण यांनी केली. परंतु केपीसीसी मीडिया विंगने स्वतःच्या गणनेवर आधारित असा दावा केला की, पक्षाला ४८ टक्के मते मिळाली आहेत तर भाजपला ४१ टक्के मते मिळाली आहेत. त्यांनी लढवलेल्या सहा जागांवर धजदने ४३.१७ टक्के मते मिळविली, याचा अर्थ या जागांवर ते अजूनही भाजपला पर्याय आहेत.

बेळगावच चर्चेत

बेळगाव द्विसदस्य जागेवर चन्नराज हट्टीहोळी (३,७१८ मते) हे कॉंग्रेसकडून राज्यात सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले तर येथे अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी २,५५२ मते घेत विजय मिळविला. अपक्षांच्या यादीमध्ये लखन व धारवाडमधील मल्लिकार्जुन हावेरी यांची १,२१७ मते वगळता इतर कोणत्याही अपक्षांना किंवा उमेदवारांना विशेष प्रभाव पाडता आला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT