election commission of india sakal
देश

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू; चार राज्यांच्या मतदार याद्या अद्यावत करण्याचे निर्देश

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - महाराष्ट्र, हरियाना आणि झारखंड या राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदार याद्यांमधील माहिती अद्ययावत करण्यास सुरूवात करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिली. या राज्यांप्रमाणे जम्मू-काश्‍मीरमध्येही मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत येत्या नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. त्याआधी राज्यात निवडणूक होणार आहे. मतदारांच्या सोईनुसार नव्या मतदान केंद्राची स्थापना करण्याचे निर्देशही आयोगाने राज्य सरकारांना दिले आहेत. ही प्रक्रिया येत्या २५ जूनपासून सुरू होणार आहे.

त्याचप्रमाणे १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदान यादीत सामावून घेण्यासाठी राज्याच्या निवडणूक आयोगाने मोहिम राबवावी, असेही या निर्देशांमध्ये म्हटले आहे. १ जुलै २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारा कोणताही युवक मतदार यादीत नाव नोंदवू शकतो. यासाठी घरोघरी जाऊन निवडणूक प्रतिनिधी नोंदणी करणार आहेत.

काश्‍मीरमध्येही लवकरच निवडणुका

जम्मू-काश्‍मीरमध्ये नवीन विधानसभा अस्तित्वात आणण्याच्या अनुषंगाने मतदारसंघाची फेररचना करण्यात येणार असल्याचेही निवडणूक आयोगाने सांगितले. ‘जम्मू-काश्‍मीरमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होतील तसेच, जम्मू-काश्‍मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी देखील योजना आखण्यात येत आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकतेच स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT