1971 चं भारत आणि पाकिस्तान युद्धा भारतासाठी अविस्मरणीय होतं. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवत एक ऐतिहासिक इतिहास रचला. हा विजय साजरा करण्यासाठी दरवर्षी 16 डिसेंबर विजय दिवस साजरा केला जातो.
1971 च्या युद्धात पाकिस्तानपासून मुक्त होत बांग्लादेश हे स्वतंत्र राष्ट्र उदयास आलं. त्यामुळे हा दिवस पाकिस्तान, बांग्लादेशसाठीही तितकाच ऐतिहासिक आहे. (Vijay Divas 2022 )
या विजयानंतरचे भारतीय सैन्याचे काही अविस्मरणीय फोटो सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. यातील काही फोटो खालील प्रमाणे-
1971 च्या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमसमोर ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी गुडघे टेकत हार पत्करली होती आणि याच युद्धामुळे स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली.
3 डिसेंबर 1971 ला पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या स्टेशन्सवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताला थेट उडी घेणे भाग पडले.
त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मध्यरात्री ऑल इंडिया रेडिओवरून युद्धाची घोषणा केली आणि भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले.
अखेर १३ दिवस चाललेल्या या युद्धात पाकिस्तानी सैन्याला भारतासमोर गुडघे टेकावे लागले. या युद्धामुळे जगाचा नकाशा बदलला व बांगलादेश हे नवे राष्ट्र उदयाला आले .
बांग्लादेश फाळणीत इंदिरा गांधी यांची महत्त्वाची भुमिका ठरली. त्यामुळे जेव्हा जेव्हा 1971 च्या युद्धाविषयी बोलले जाईल तेव्हा तेव्हा इंदिरा गांधी यांचं नाव समोर येणार.
यावेळी अनेक सैन्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हे युद्ध भारताच्या नावी केलं.
16 डिसेंबर 1971 च्या ऐतिहासिक विजयाचा आनंद आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात उत्साहाने भरतो.
या विजयानंतरचे भारतीय सैन्याचे काही अविस्मरणीय फोटो सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
51 वर्षांपूर्वी भारताच्या शूर सैनिकांनी आपल्या अदम्य साहस आणि शौर्याच्या जोरावर मिळवलेल्या विजयाला सलाम करणारा हा दिवस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.