नवी दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्सच्या ९,००० कोटींहून अधिकच्या बँक कर्ज थकबाकीच्या प्रकरणात फरार उद्योगपती विजय मल्ल्याने (Vijay Mallya) न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सुरू असलेली सुनावणी (Hearing) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. (Hearing against Vijay Mallya)
न्यायालयापासून माहिती लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली विजय मल्ल्या २०१७ मध्ये दोषी आढळला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याआधी २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली होती. यामध्ये त्यांनी फरारी मल्ल्याला वैयक्तिकरित्या किंवा त्याच्या वकिलामार्फत हजर राहण्याची शेवटची संधी दिली होती.खंडपीठाने म्हटले होते की, मल्ल्याला वैयक्तिकरित्या किंवा वकिलाद्वारे हजर राहण्याची अनेकवेळा संधी दिली आहे. ३० नोव्हेंबर २०२१ च्या शेवटच्या आदेशात विशिष्ट निर्देशही दिले आहेत.
न्यायालयापासून माहिती लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली विजय मल्ल्या २०१७ मध्ये दोषी आढळला आहे. मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि किंगफिशर एअरलाईन्समधील प्रकरणात संपत्तीचे संपूर्ण तपशील उघड करण्यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्यायमूर्ती एस. रविंद्र भट आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.