Vijay Mallya Sakal
देश

मल्ल्याला फक्त २००० रुपये दंड ? चकित होऊ नका, कायदा समजावून घ्या!

सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला ही शिक्षा सुनावल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी फरार उद्योगपती विजय मल्ल्याला आज न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. केंद्र सरकारने मल्ल्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. मल्ल्याने परदेशी खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केल्याप्रकरणी कोर्टाला चुकीची माहिती दिल्याचं केंद्रानं सांगितलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता विजय मल्ल्याला चार महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मात्र, केवळ दोन हजार रुपयांचा दंड ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित झाला असाल. जाणून घ्या याबाबत कायदा काय सांगतो? परदेशी खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याविषयी चुकीची माहिती देणं, तसंच गेल्या पाच वर्षांमध्ये न्यायालयासमोर हजर न होणं हा न्यायालयाचा अवमान असल्याचं सांगत त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. शिक्षेवर चर्चा करण्यासाठी विजय मल्ल्या आत्तापर्यंत एकदाही न्यायालयासमोर आलेला नाही किंवा त्याच्या बाजूने कोणता वकीलही आलेला नाही. १० फेब्रुवारी रोजीही सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी टाळणाऱ्या मल्ल्याला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.

कायदा काय सांगतो?

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जास्तीत जास्त ६ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. मल्ल्या प्रकरणात निर्णय़ देताना न्यायमूर्ती यू यू ललित, एस रविंद्र भाट आणि पी एस नरसिंह यांच्या खंडपीठाने सांगितलं होतं की संविधानातल्या अनुच्छेद १४२ आणि १४५ अंतर्गत अशा प्रकारे शिक्षेची कोणतीही मर्यादा निश्चित करता येत नाही. त्याप्रमाणे आता सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला चार महिन्यांचा कारावास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oils Price: दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; खाद्यतेलाच्या किंमती 29 टक्क्यांनी वाढल्या

नगरसेवक फोडले; एकाने येऊन सांगितलं, मला फोन आलेला पण... अमित ठाकरेंनी गिरवला खोक्यांचा इतिहास!

Diwali 2024 Flowers Rangoli Designs: यंदा दिवाळीत अंगणात काढा 20 मिनिटांत फुलांची सुंदर रांगोळी , सर्वजण करतील कौतुक

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

आदिनाथ नाही तर लक्ष्याचा खरा लेक अभिनय होता 'झपाटलेला 2' चा खरा हिरो ! पण 'या' कारणामुळे हुकली संधी

SCROLL FOR NEXT