'आपला अहंकार बाजूला ठेवून भाजपशी दोन हात करण्यासाठी ही योग्य संधी चालून आलीय.'
Goa Assembly Election 2022 : गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला (BJP) विरोध करणाऱ्यांनी एकत्र येण्याची वेळ आलीय. GFP, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस (TMC) आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) यांनी सत्ताधारी भाजपचा अहंकार मोडून काढण्यासाठी व्यापक आघाडीचा भाग म्हणून हातमिळवणी करायला हवी, असं स्पष्ट आवाहन गोवा फॉरवर्ड पार्टीचे (जीएफपी) अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी भाजप विरोधी पक्षांना केलंय.
सरदेसाईंच्या GFP नं आधीच काँग्रेससोबत (Congress) निवडणूकपूर्वी युतीची घोषणा केलीय, तर MGP आणि TMC नं 40 सदस्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांची युती केलीय. गुरुवारी मडगाव शहरात पत्रकारांशी बोलताना सरदेसाई म्हणाले, कोविड निर्बंधांच्या नावाखाली निवडणूक प्रचारादरम्यान भाजप इतर पक्षांसोबत घाणेरडं राजकारण करत आहे. सध्या कोरोना विषाणूची (Coronavirus) परिस्थिती आणि पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता, हे निर्बंध लागू होतील. यामुळं भाजपला निर्बंधांच्या नावाखाली गलिच्छ राजकारण खेळण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी म्हंटलंय.
सरदेसाई पुढे म्हणाले, निर्बंध लादल्यास भाजपला याचा फायदा होणार असून निर्बंधांच्या आडून आमच्या रॅलींना परवानगी देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. गोव्याला भाजप व्हायरसपासून मुक्त करण्यासाठी आम्हाला 'टीम गोवा' आवश्यक आहे. यासाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड (Goa Forward Party), टीएमसी आणि एमजीपी यांनी एकत्र आलं पाहिजे. आपला अहंकार बाजूला ठेवून भाजपशी दोन हात करण्यासाठी ही योग्य संधी चालून आली असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, यात सरदेसाईंनी आम आदमी पक्षाचा (Aam Aadmi Party) कुठेच उल्लेख केला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.