Chhatrapal Gangwar Viral Audio Clip Esakal
देश

Viral Audio Clip: दारूचे दुकान लवकर बंद झाल्याची तक्रार, "खासदार म्हणाले दिल्लीतून पाठवू का"? ऑडिओ क्लिप व्हायरल

Chhatrapal Gangwar: काल बरेली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनीही जय हिंदु राष्ट्र म्हणत शपथविधी पूर्ण केला. यानंतर संसदेत मोठा गोंधळ उडाला होता.

आशुतोष मसगौंडे

सामान्यपणे दारूची दुकाने उशिरा उघडी असल्या बाबतच्या तक्रारी येत असतात मात्र बरेलीमध्ये एक नवीनच प्रकरण समोर आले आहे. जिथे एका व्यक्तीने खासदार छत्रपाल गंगवार यांना फोन करून दारूचे दुकान दहा वाजण्यापूर्वी बंद झाल्याची तक्रार केली. आपल्याला दारूची गरज असून, लवकर दुकान बंग करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी खासदारांकडे त्या व्यक्ती केली. या संपूर्ण संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबतचे वृत्त अमर उजाला या संकेतस्थळाने दिले आहे.

सुरुवातीला खासदार छत्रपाल यांना फोन करणारा व्यक्ती काय बोलत आहेत हे समजले नाही. नंतर ते म्हणाले की मी आता दिल्लीत आहे. आता मी दिल्लीहून दारू पाठवून देतो. यावेळी खासदारांनी त्या व्यक्तीला सुधारण्याचा इशाराही दिला. खासदार म्हणाले की, त्यांना चांगल्या चांगल्यांना त्यांनी सुधारले आहे. "तू मला अजून नीट ओळखले नाहीस, शुद्धीवर ये," असेही हे खासदार यावेळी म्हणाले. या संपूर्ण संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

फोनवरचे संभाषण

अशरफिलाल गंगवार: नमस्कार सर, छत्रपाल जी बोलत आहेत.

खासदार छत्रपाल गंगवार: हा बोलतोय.

अशरफिलाल गंगवार: मी अशरफिलाल लाल गंगवार आहे, दारूचे दुकान 10 च्या आधी बंद केले आहे, त्यांच्यावर कारवाई करा.

खासदार छत्रपाल गंगवार: तुम्ही काय म्हणताय ते समजत नाही.

अशरफिलाल गंगवार: दारूचे दुकान 10च्या आधी बंद झाले आहे, ते दारू देत नाहीत.

खासदार छत्रपाल गंगवार: तुम्हाला दारू हवी असेल तर दिल्लीहून पाठवतो.

अशरफिलाल गंगवार: दिल्लीहून पाठवणार?

खासदार छत्रपाल गंगवार: मी दिल्लीत बसलोय, तेव्हा दिल्लीहूनच पाठवणार, आणखी कुठे पाठवू?

अशरफिलाल गंगवार: हरकत नाही, तुम्ही दिल्लीतच बसा.

खासदार छत्रपाल गंगवार: तुम्ही कुठले आहात?

अशरफिलाल गंगवार: भोजीपुरा गाव पिपळसणा.

अशरफिलाल गंगवार: माझा नंबर सेव्ह करा तुम्हाला कधीतरी गरज पडेल.

खासदार छत्रपाल गंगवार : नंबर का सेव्ह करू, दारूची व्यवस्था करण्यासाठी? तुम्ही मला अजून ओळखले नाही, मला थोडे ओळखा, गैरसमजात राहू नका. तुम्ही मला ज्या प्रकारची व्यक्ती समजता मी तसा नाही. दारूची व्यवस्था मी करून देईन, हा गैरसमज कृपया दूर करा. मी कित्येक लोकांना यातून सोडवले आहे. तुम्ही मला अजून ओळखले नाही, कृपया मला ओळखा आणि मग बोला.

दरम्यान व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप खासदार छत्रपाल गंगावार यांचीच असल्याची पुष्टी अजून झालेली नाही.

18व्या लोकसभेच्या संसदेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. एकीकडे AMIMIM प्रमुख आणि हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय पॅलेस्टाईन'चा नारा देत वाद निर्माण केला.

तर दुसरीकडे बरेली लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनीही जय हिंदु राष्ट्र म्हणत शपथविधी पूर्ण केला. यानंतर संसदेत मोठा गोंधळ उडाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT