Pakistan News Viral: सोशल मीडियावर (Social media) कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही सोशल मीडियाचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे. मात्र अनेकदा नेटकऱ्यांच्या ही गोष्ट ध्यानात येत नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागत असल्याचे दिसून आले आहे. पाकिस्तानमध्ये (Paksitan) अशीच एक घटना घडली आहे. त्यामध्ये एका महिलेनं आपल्या व्हाट्स अॅपवर (Whats up) जे मेसेज लिहिले होते त्यामुळे तिला चक्क न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. तिनं काही धर्म आणि धर्माचे संस्थापक यांच्याबद्दल वादग्रस्त मेसेज लिहिल्याची बाब समोर आली आहे.
देवाची निंदा (Abusing God) करणं त्या महिलेला भोवलं आहे. त्यामुळे तिला फाशीची शिक्षा (Death Punishment) सुनावली आहे. महिलेवर आरोप कऱण्यात आला आहे की, तिनं व्हाट्स अॅपवर आपल्या धर्माचे संस्थापक यांच्याविरोधात काही आक्षेपार्ह मेसेज लिहिले आणि ते व्हायरल केले. व्हायरल झालेल्या त्या मेसेजवरुन तिला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी ट्रोल केले. आणि तिच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार तिला अटक करण्यात आली. जेव्हा कोर्टासमोर तिला हजर करण्यात आले तेव्हा कोर्टानं तिच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यापूर्वी देखील पाकिस्तानात देवाची निंदा या प्रकरणावरुन काही घटना घडल्या होत्या. कट्टर धर्माचा पुरस्कर्ता असणाऱ्या या देशामध्ये कायद्यावर देखील धर्माचा पगडा असल्याचे दिसून आले आहे. डॉन या पाकिस्तनातील प्रमुख वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, कोर्टानं फारुक हसनात यांनी केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. त्यामध्ये अनिका अतीक नावाच्या महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिच्यावर वेगवेगळे तीन आरोप करण्यात आले आहे. त्यामध्ये देवाची निंदा, धर्माविषयी वादग्रस्त लिखाण आणि सायबर कायद्याचे उल्लंघन असे आरोप तिच्यावर ठेवण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.