Delhi Uber Driver Providing Free WiFi And Snacks : तुम्हाला कॅब बुक केल्यावर बराचवेळ कॅब मिळतच नाही, मिळाली तर बराच वेळ वाट बघितल्यानंतर अचानक कॅन्सल होते असा अनुभव आलाय? त्यामुळे चीडचीड होणं सहाजिकच आहे. पण प्रवाशांचा पाहुणचार करणारा, काळजी घेणारा एखादा कॅबवाला भेटलाय का?
अशी एक कॅब आणि तिचा ड्रायव्हर सध्या सोशल मीडीयावर चर्चेचा विषय झाला आहे. कॅबमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय, स्नॅक्स देत असल्याची पोस्ट सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
ही कॅब आणि त्याचा ड्रायव्हर दिल्लीचा आहे. या कॅबमध्ये फक्त सुरक्षित प्रवासच नाही तर लग्झरी वागणूकही मिळते. एका ट्विटर वापरकर्त्याने मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर त्याचा अनुभव शेअर केला आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, अब्दुल कादीर नावाच्या त्याच्या कॅब ड्रायव्हरने त्याला प्रभावित केले.
त्याने त्याच्या कॅबसह उबेर ड्रायव्हरचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये विविध स्नॅक्स, खाद्यपदार्थ दिसत होते. प्रवाशांसाठी दोन सूचना फलकही लावण्यात आले आहेत. एक बोर्ड वाय-फाय पासवर्ड सांगतो आणि सेवा विनामूल्य असल्याचे सांगते, तर दुसरा बोर्ड कॅब 'प्रत्येक धर्माच्या लोकांचा आदर आणि स्वागत करते, असे सांगणारा आहे.
त्या यूझरने लिहिले होते की, कॅबमध्ये विनामूल्य प्रथमोपचार किट आणि इतर अनेक आवश्यक गोष्टी आहेत, तसेच गरीब मुलांसाठी दानपेटी आहे. या कॅब ड्रायव्हरने गेल्या ७ वर्षात क्वचितच एखादी राईड कॅन्सल केली आहे. त्यामुळे तो यूझर फार प्रभावित झाला.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, उबेरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरोशाही यांनी ड्रायव्हरसंबंधी, त्यांच्यासमोरील आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी स्वत: उबेर ड्रायव्हरचा वेश परिधान केला. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार खोसरोशाहीने डेव्ह के नावाने लोकांना सेवा दिली. या मोहिमेला प्रोजेक्ट बूमरँगचे कोड-नाव होते. तो वापरत असलेली कार ग्रे टेस्ला मॉडेल Y होती जी सेकंडहँड होती. CEO ने रायडर्सना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आणले आणि त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला.
यातून त्यांना मॅनेजमेंटच्या लोकांचे उन्मत्त शब्दात बोलणारे फोन कॉल्स, शिवाय प्रवाशांची पैशांवरून, टीप वरून फसवेगीरी याचा त्यांनी यात अनुभव घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.