Bihar Bridge Accident Esakal
देश

Viral Video: बिहारमध्ये 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनापूर्वीच कोसळला, पाहा व्हिडिओ

आशुतोष मसगौंडे

बिहारमध्ये पुन्हा एकदा पूल दुर्घटना घडली आहे. येथे उद्घाटनापूर्वीच पूल नदीत कोसळला. ही घटना अररिया जिल्ह्यातील सिक्टी परिसरात घडली. येथे बाकरा नदीच्या पडरिया घाटावर करोडो रुपये खर्चून बांधलेला पूल अचानक नदीत कोसळला.

हा अपघात मंगळवारी दुपारी घडला. 182 मीटर लांबीचा हा पूल तीन भागात बांधण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप लोक करत आहेत, त्यामुळे उद्घाटनापूर्वीच पूल कोसळला.

प्रधानमंत्री ग्रामीण सडक निर्माण योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या या पुलाची किंमत ७.७९ कोटी रुपये होती. 182 मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम 2021 मध्ये सुरू झाले.

सुरुवातीला यासाठी 7 कोटी 80 लाख रुपये खर्च आला होता, मात्र नंतर नदीचा मार्ग आणि अप्रोच रोड बदलल्याने एकूण खर्च वाढून 12 कोटी रुपये झाला.

पुलाच्या दोन्ही बाजूला जाण्यासाठी रस्ते नसल्यामुळे त्यावरून वाहतूक होत नव्हती. एकूण बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुलाच्या स्लॅबला भेगा पडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंगळवारी हा पूल अचानक कोसळला.

पूल दुर्घटनेनंतर खासदार प्रदीपकुमार सिंह आणि भाजपचे आमदार विजय कुमार मंडल यांनी हा निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.

खासदार व आमदारांनी पुलाच्या पाइलिंगच्या अनियमिततेबाबत बोलून ठेकेदारावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला.

या प्रकरणाची उच्चस्तरीय पथकाकडून चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Retention : MS Dhoni अनकॅप्ड खेळाडू, परदेशी खेळाडूंवर बंदीची तलवार... BCCI ने जाहीर केले ८ महत्त्वाचे नियम

IND vs BAN 2nd Test : दुसऱ्या दिवसावर पडलं पावसाचं पाणी, भारतात ९ वर्षांनी पहिल्यांदाच असं झालंय

Manoj Jarange: यंदा मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा? 'येथे' होणार भव्य-दिव्य कार्यक्रम, उद्या बीडमध्ये बैठक

IND vs BAN: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या कॅप्टन, तर 150 kmph वेगात बॉलिंग करणाऱ्या मयंक यादवलाही संधी

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर परिणाम होणार'' राज ठाकरेंनी मांडलं गणित

SCROLL FOR NEXT