देश

Viral Video: पॅरोल संपला! राम रहिमला घेऊन दहा गाड्यांचा ताफा तुरुंगाकडं रवाना

राम रहिमला घेऊन जाण्याऱ्या ताफ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

रोहतक : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु गुरमीत राम रहिम पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. पण आता ४० दिवसांचा पॅरोल संपल्यानं त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली आहे. त्याला तुरुंगात मोठा सुरक्षा व्यवस्थेत नेण्यात आलं, यावेळी सुमारे १० ते १५ गाड्यांचा ताफा तुरुंगाकडं रवाना झाला. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Viral Video Grmeet Ram Rahim Parole is over a convoy of ten cars took him to Sunariya jail)

राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. २० जानेवारी २०२३ ला त्याला जेव्हा ४० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला होता तेव्हा ही बातमी कळताच त्याच्या आश्रमामध्ये स्वागताची जंगी तयारी सुरु झाली होती. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी गुरमीत राम रहीम याला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला होता. या पॅरोलच्या कालावधीत तो उत्तर प्रदेशच्या त्याचा बरनावा आश्रमामध्ये गेला होता.

दोन शिष्यांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राम रहीम शिक्षा भोगत आहे. यानंतर त्याला दोनदा पॅरोलची रजा मंजूर झाली आहे. माजी डेराप्रमुखांच्या जयंती कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी त्यानं या रजेसाठी अर्ज केला होता.

हे ही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

15 ऑक्टोबरला आला होता बाहेर

डेरा प्रमुख राम रहीम 15 ऑक्टोबर 2022 रोजी पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला होता. चाळीस दिवस तो बर्नावा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात राहिला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मुलगी हनीप्रीत आणि इतर कुटुंबीयही होते. राम रहीमनं डेरामध्ये दिवाळी आणि डेरा संस्थापकाची जयंतीही साजरी केली होती. तसेच या पॅरोलच्या काळात राम रहीमनं ऑनलाइन सत्संगही केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Resignation: CM एकनाथ शिंदे यांचा राजीनामा , बनणार काळजीवाहू मुख्यमंत्री, कोणते अधिकार कमी होणार ?

Satara Election Results : 'जयकुमार तुमचा तो शब्द अखेर खरा ठरला'; आमदार गोरेंचं कौतुक करत असं का म्हणाले फडणवीस?

"कोण किशोर कुमार ?" आलियाच्या प्रश्नाने रणबीरला बसला धक्का ; म्हणाला...

Latest Marathi News Updates : मिलिंद नार्वेकर वर्षा बंगल्यावर गेलेच नाहीत, राजकीय चर्चा खोट्या

Constitution Day 2024 : संविधान दिन साजरा करताय ? आधी आपल्या जबाबदाऱ्या जाणून घ्या

SCROLL FOR NEXT