crime news esakal
देश

पश्चिम बंगालमध्ये भर बाजारात दोन महिलांना विवस्त्र करुन मारहाण; घटनेने देशभरात संताप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः मणिपूर घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंरत देशभरातून संतापाची लाट उसळलेली आहे. त्यातच आता पश्चिम बंगालमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन मारहाण झाल्याची माहिती पुढे येतेय.

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यामध्ये कथितपणे दोन आदिवासी महिलांना नग्न करुन त्यांना मारहाण करण्यात आलीय. सोशल मीडियामध्ये या घटनेचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार सदरील घटना १९ जुलै रोजी मालदा जिल्ह्यातील बामनगोला येथे घडली. पाच आदिवासी महिला बाजारामध्ये आपली उत्पादनं विक्री करत होत्या. त्यांना चोरी करतांना बघितल्याचं सांगण्यात येत आहे. चोरी करतांना त्यांना पकडलं मात्र तीन महिला पळून गेल्या. उर्वरित दोन महिलांना इतर महिलांनी बाजारपेठेमध्ये पकडून मारहाण केल्याचा आरोप आहे.

सदरील घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी संबंधित व्हीडिओ शेअर करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून मणिपूरमधील व्हीडिओ व्हायरल झाल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. मणिपूरमध्ये एका टोळक्याने दोन महिलांना विवस्त्र धिंड काढली. त्यातील एका महिलेवर जमावाने अत्याचार केले. त्यातच आता पश्चिम बंगालची घटना समोर येतेय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : आमदार राजेद्र शिंगणे यांची अजित पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

बिग बॉस फेम अरमान मलिकचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला जीव, व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT