संजीव गोहील-पुष्पक कोटिया  
देश

जबरदस्त! अंध व्यक्तीने सर केलं हिमालयातील १७ हजार फूट उंचीचं शिखर

बर्फाळ प्रदेशामुळे हिमालयात गिर्यारोहण पूर्णपणे वेगळा अनुभव होता.

दीनानाथ परब

वडोदरा: अशक्य कधीच काही नसतं. मनात विश्वास, दृढ इच्छाशक्ती आणि जिद्द असेल, तर सर्वकाही शक्य होऊ शकतं. गुजरातच्या वडोदरामध्ये राहणाऱ्या संजीव गोहील (Sanjeev Gohil) यांनी आपल्या कृतीतून हे सिद्ध करुन दाखवलं आहे. दृष्टीहीन (Visually challenged) असलेल्या संजीव यांनी हिमालयातील १७ हजार फुट उंचावरील एक शिखर सर (Himalayan peak) केलं. यामध्ये संजीव यांना मदत झाली ती, त्यांचे मित्र पुष्पक कोटीया यांची. संजीव यांनी हिमालयातील प्रतिकुल वातावरणाचा सामना करत, फ्रेंडशिप शिखर (Friendship peak) सर केलं.

कडाक्याची थंडी, उणे तापमानाचा सामना करत, संजीव आणि त्यांचे मित्र पुष्पक यांनी समुद्रसपाटीपासून १७,३४६ फूट उंचावरील फ्रेंडशिप शिखर सर केलं. "मला ट्रेकिंगचा अनुभव आहे. पावागड, जांबुघोडाचे डोंगर मी चढलोय. पण बर्फाळ प्रदेशामुळे हिमालयात गिर्यारोहण पूर्णपणे वेगळा अनुभव होता. माझ्या मित्रामुळे मला हे शक्य झाले" असे संजीव (४३) यांनी सांगितले. ते भारतीय पोस्ट सेवेत सहाय्यक म्हणून नोकरी करतात. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

संजीव गोहील यांना २००१ मध्ये रेटिनाइटिस पिगमेंटोसा हा नजरेचा आजार झाला. आता ते नजरेने काही पाहू शकत नाही. त्यांनी १०० टक्के दृष्टी गमावली आहे. नजर नसली, तरी जंगल सफारी, पर्यावरण संवर्धन, गिर्यारोहणाची त्यांची आवड आजही कायम आहे. त्यामुळेच संजीव आज हिमालयातील शिखर सर करु शकले.

हिमालयात गिर्यारोहण करताना मित्र पुष्पक संजीव यांचा मुख्य मार्गदर्शक होता. संजीव यांच्या बॅगेची एक पट्टी पुष्पक यांच्याशी जोडलेली होती. त्याच्या खांद्याच्या हालचालीवरुन पुढचे पाऊस कसे टाकायचे ते संजीव ठरवत होते. काही निमुळते, घसरणारे खडक होते. काही मजबूत खडक होते. घसरणाऱ्या खडकावर पाय ठेवला, तर पडण्याची भीती होती, असं संजीव गोहील यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

SCROLL FOR NEXT