बुद्धिबळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा विश्वनाथन आनंदचा आज वाढदिवस. आनंदचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी तमिळनाडूतील एका लहान शहरात झाला.
आनंदचे वडील विश्वनाथन अय्यर दक्षिण रेल्वेचे निवृत्त महाव्यवस्थापक होते तर आई बुद्धिबळाची प्रशिक्षक होती. त्याला एक बहीण आणि एक भाऊ आहे. या सर्वांमध्ये आनंदच मोठा होता. आईमुळेच आनंद बुद्धीबळाकडे वळला आणि आज त्यान यात महारथ हासिल केले
आनंद बुद्धिबळाचा एक चाणाक्ष खेळाडू म्हणून नावाजलेला आहे. 1988 साली आनंद भारताचा पहिला ग्रैंडमास्टर बनला. 2000 साली फिडे World Chess Championship जिंकणारा विश्वनाथन आनंद पहिला भारतीय ठरला.
विश्वनाथन आनंद ने आपल्या कारकिर्दीत 6 वेळा बुद्धिबळ ऑस्कर जिंकला. एवढंच काय तर 5 वेळा World Chess Champion राहीला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या यशापर्यंत तो सहज पोहचला नाही. त्याच्या आयुष्यात असे पाच टर्निंग पॉंइट आले आणि त्याचं आयुष्यचं बदललं. याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत
1991: इटलीमध्ये सर्जिकल स्ट्राइक
1988 मध्ये भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनने ही आनंदसाठी खूप मोठी अचिवमेंट थी मात्र 1991 मध्ये रेगिओ एमिलिआ टूर्नामेंटचा खिताब त्याच्या करियरसाठी मोठा टर्निंग पॉंइट ठरला. त्याने काळ्या मोहऱ्यांनी गॅरी कास्परोवला हरवत बुद्धीबळाच्या जगात आपलं नाव कोरलं.
2000: फीडेचा नवा चँपियन
क्लासिक वर्ल्ड रॅपिड चँपिअनशिप टूर्नामेंट नॉकआउट फॉर्मेटमध्ये खेळला गेला. 2000 साली फिडे World Chess Championship जिंकणारा विश्वनाथन आनंद पहिला भारतीय ठरला होता.
2008: पहिल्यांदा वर्ल्ड चँपिअन
वर्ल्ड चँपियनशिप मध्ये पहिल्यांदा आनंदनी सर्वांना मागे टाकले. डी4 नी सुरवात केली. मेरान संग सेमीफाइनल आणि नंतर चँपिअनशिपचं टायटलनी त्याला गौरविण्यात आलं.
2010: अनोखं यश
दिग्गज वेसेलिन टोपालोव याला हरविले. त्यानंतर प्रतिद्वंद्वी ज्यांचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवर वर्चस्व होतं, ते वर्चस्व कायमचं संपवलं. काळ्या मोहऱ्यांनी जिंकत त्यांनी मायनस पासून सुरवात केली होती.
2014-18: वॉरिअर सिद्ध झाले
खंटी-मानसीस्क (रशिया) मध्ये 2014 चा कँडिडेट्स टूर्नामेंट जिंकला आणि योग्यतेच्या आधारावर मैग्नस कार्लसनच्या विरोधात वर्ल्ड टायटल जिंकला. या क्षेत्रात युवा आणि काही कंप्यूटर तज्ञ सहभागी होते. याशिवाय 2 वर्षाआधी रियादमध्ये कार्लसनच्या उपस्थितीत उविश्व रॅपिड खिताब त्याने जिंकला आणि 2018 मध्ये कोलकातामध्ये टाटा स्टील शतरंज भारत ब्लिट्ज टूर्नामेंटही जिंकला.
का महत्त्वाची होती ही अचिव्हमेंट?
आनंद पहिल्या चरणात चौथ्या स्थानावर आहे. टूर्नामेंटमध्ये शेवटच्या दिवशी भारतीयांनी सहा डाव जिंकले आणि तीन ड्रॉ खेळले. जगातील तिसऱ्या नंबर असलेल्या अमेरिकीच्या नाकामुराच्या बरोबरीला आले. यानंत विजेता ठरविण्यासाठी दोन डावांचा प्लेऑफ खेळला गेला. जो ब्लिट्जपेक्षाही तेजी होता. आनंद नी पांढऱ्या मोहरांनी डाव जिंकत गेम आपल्या नावी केला त्यानंतर काळ्या मोहरांनी ड्रॉ खेळत 1.5-0.5 नी जिंकून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.