Volcanic Eruption esakal
देश

Volcanic Eruption : पृथ्वीच्या दिशेने येत असलेला धूमकेतू वाटेतच फुटला, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लाखो किमीवर पसरला वायू

सूर्याच्या दिशेने निघालेला एक ज्वालामुखी धूमकेतू फुटताना दिसला

सकाळ डिजिटल टीम

Volcanic Eruption : सूर्याच्या दिशेने निघालेला एक ज्वालामुखी धूमकेतू फुटताना दिसला आहे. हा धूमकेतू अवकाशात अत्यंत थंड मॅग्मा पसरवतोय. स्फोटानंतर तो लहान ताऱ्यासारखा चमकतोय, त्यामुळे त्याला शिंग फुटल्यासारखं दिसत आहे. मागच्या 70 वर्षांतून पहिल्यांदाच असा धूमकेतू फुटताना दिसला आहे. या धूमकेतूचं नाव आहे 12P/Pons-Brooks (12P). हा एक क्रायोव्होल्कॅनिक धूमकेतू आहे.

धूमकेतू हा एखाद्या मोठ्या शहरासारखा असतो.

सर्वसाधारणपणे धूमकेतू बर्फ, धूळ आणि वायूच्या मिश्रणाने भरलेल्या घन केंद्रकांपासून तयार होतात. ते कोमा नावाच्या वायूच्या ढगांनी वेढलेले असतात. धूमकेतूच्या आतील भागातून हा पदार्थ बाहेर येत असतो. परंतु इतर धूमकेतूंच्या विपरीत, 12P च्या न्यूक्लियसमध्ये इतका वायू आणि बर्फ जमा झाला आहे की तो अतिशय स्फोटक ठरतोय. न्यूक्लियसच्या कवचातील मोठ्या भेगा आतून बाहेर येऊ लागल्या. त्यांना क्रायोमाग्मा म्हणतात.

कोमा 2.3 लाख किमी पर्यंत वाढला

20 जुलै रोजी अनेक खगोलशास्त्रज्ञांनी धूमकेतूमध्ये एक मोठा स्फोट झालेला पाहिला. हा स्फोट नेहमीच्या स्फोटापेक्षा 100 पट अधिक उजळ होता असं वृत्त स्पेसवेदरने दिलं आहे. धूमकेतूचा कोमा अचानक आतल्या भागातून बाहेर पडलेल्या वायू आणि बर्फाच्या स्फटिकांनी फुगला, त्यानंतर त्याच्या प्रकाशात वाढ झाली. त्यामुळे जास्त सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकतो. क्रायोव्होल्कॅनिक धूमकेतूंचा अभ्यास करणारे खगोलशास्त्रज्ञ रिचर्ड माइल्स यांनी 26 जुलै रोजी सांगितलं की त्याचा कोमा 230,000 किमी पर्यंत वाढला आहे. हा 30 किमीच्या त्याच्या केंद्रकाच्या व्यासापेक्षा या अंदाजे 7000 पट रुंद झाला होता.

विशेष म्हणजे आकारातील या अनियमिततेमुळे धूमकेतूला शिंगे फुटल्यासारखं दिसू लागलं आहे. अनेक तज्ञांनी त्याची तुलना स्टार वॉर्स चित्रपटातील मिलेनियम फाल्कन या स्पेसशिपशी केली. माईल्सने सांगितले की धूमकेतूच्या कोमाचा असामान्य आकार कदाचित 12P च्या केंद्रकाच्या आकारातील अनियमिततेमुळे झाला आहे. ते म्हणाले की 69 वर्षात प्रथमच 12P मध्ये एवढा मोठा स्फोट झाला आहे. अहवालानुसार, हा धूमकेतू 21 एप्रिल 2024 रोजी सूर्याच्या सर्वात जवळ असेल आणि 2 जून 2024 रोजी तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. त्यावेळी तो रात्रीच्या आकाशात दिसू शकतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT