Voting Machine sakal
देश

Voting Machine : शंका वाटते? ‘मॉक पोल’ घ्या, पावत्या मोजा!निवडणूक आयोगाचे नाराज उमेदवारांना नवे पर्याय

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या उमेदवारांना कोणत्याही मतदान केंद्रातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची (ईव्हीएम) पडताळणी करण्याबरोबरच ‘मॉक पोल’ आणि ‘व्हीव्हीपॅट’च्या पावत्यांची मोजदाद करण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून देण्यात आला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’मधील कथित हेराफेरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. आता याप्रकरणी चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांना अनेक पर्याय दिले आहेत. या पर्यायांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी करण्यात येणारे ‘मॉक पोल’, ‘व्हीव्हीपॅट’च्या पावत्यांच्या मोजणीचासुद्धा समावेश आहे. निवडणूक निकालांच्या घोषणेनंतर ‘ईव्हीएम’च्या मेमरी चीप व मायक्रो कंट्रोलरच्या पडताळणीसाठी लोकसभा व विधानसभेच्या काही उमेदवारांनी अर्ज केला आहे. पराभूत उमेदवार ‘ईव्हीएम’ची पडताळणी करण्यासाठी कोणत्याही मतदारसंघातील यंत्राची निवड करू शकतात. यासंदर्भात आतापर्यंत ११ उमेदवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केले आहेत. ‘ईव्हीएम’च्या फेरपडताळणीबरोबरच मायक्रो कंट्रोलर चिपच्या सुधारणेची मागणी करणारे आठ अर्ज आयोगाकडे आले होते.

न्यायालयाने फेटाळली याचिका

‘ईव्हीएम’मधील हेराफेरीचा आरोप सर्वोच्च न्यायालयाने आधीच निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावला आहे. गेल्या २६ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’द्वारे मतदान प्रक्रियेऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. त्याचवेळी दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना शुल्क भरून ईव्हीएमची पडताळणी करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. याशिवाय पराभूत उमेदवार लोकसभा व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रातील विशिष्ट क्रमांकाच्या ‘ईव्हीएम’ची पडताळणी करण्याचा पर्याय देऊ शकतात. यामुळे मतदान केंद्रातील संबंधित अधिकाऱ्याने या ईव्हीएममध्ये कोणतीही हेराफेरी केली नसल्याचे स्पष्ट होईल, असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Protest : आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरुद्ध भाजपचे आंदोलन

धक्कादायक! वड्यात मीठ जास्त असल्याची तक्रार; 'जोशी वडेवाले' हॉटेलमध्ये महिलेसह चिमुकल्यांसोबत मारहाणीची घटना

Pune News : विद्यार्थ्यांच्या उपोषणाला आक्रमक वळण ‘सारथी’च्या इमारतीचे काम बंद

जर Joe Root ने सचिनचा विक्रम मोडला, तर असा काय फरक पडणारे? गावसकरांचा माजी कर्णधाराला थेट सवाल

Arvind Kejriwal यांची तिहार तुरुंगातून सुटका, जेलमधून बाहेर येताच म्हणाले- देशाचे विभाजन करून...

SCROLL FOR NEXT