watch video Nitish Kumar checks PM Modi finger  Nalanda University opening marathi news
watch video Nitish Kumar checks PM Modi finger Nalanda University opening marathi news  
देश

Nitish Kumar Video : नीतीश कुमारांनी भर कार्यक्रमात का धरला PM मोदींचा हात? तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील नालंदा यूनिव्हर्सिटी कॅम्पसचे उद्घाटनासाठी राजगीर येथे गेले होते. या कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावार तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नीतीश कुमार मोदींचा हात हातात घेताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये नीतीश कुमार पंतप्रधान मोदींच्या डाव्या हाताच्या बोटांना मतदान केल्यानंतर लावण्यात आलेली शाई पाहताना दिसत आहेत. यानंतर नीतीश कुमार यांनी स्वतःची बोटे देखील मोदींना दाखवली. ही घटना घडली तेव्हा कॅम्पसच्या उद्घाटन कार्यक्रमात नालंदा यूनिव्हर्सिटीचे चान्सलर अरविंद पनगढिया भाषण करत होते.

यादरम्यान अचानक कॅमऱ्याने पीएम मोदी आणि नीतीश कुमार यांच्यावर फोकस केलं. व्हिडीओमध्ये नीतीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींचा हात हातात घेतला होता आणि त्याला लावण्यात आलेली शाई ते पाहात होते. जेव्हा नीतीश कुमार यांनी मोदींचा हात पकडला तेव्हा पंतप्रधान मोदी देखील आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं.

इतकंच नाही तर मोदींच्या मागे उभे असलेले सुरक्षा रक्षक देखील चकीत झाले. इतकंच नाही तर नीतीश कुमार यांनी स्वतःची बोटे देखील मोदींना दाखली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि लोक मोठ्या संख्येने तो शेअर करत आहेत. यावेळी अनेकांनी दोन नेत्यांमध्ये काय चर्चा सुरू असेल? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नालंदा विद्यापीठाच्या ४५५ एकर कॅम्पसचे उद्घाटन केले आहे. हे विद्यापीठ त्याच जागेवर उभारण्यात आले आहे जेथे प्राचीन काळात ते होते. या नव्याने तयार करण्यात आलेल्या सेंट्रल यूनिव्हर्सिटीच्या परिसरात अकॅडमीक ब्लॉक असतील. यापैकी ४० क्लासरूम असणार आहेत आणि १९०० च्या जवळपास विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था असेल. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टम आणि ऑडिटोरियम इत्यादी व्यवस्था देखील असेल. या विद्यापीठात विजेच्या व्यवस्था सोलर सिस्टमवर आधारीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumabi Traffic Ambani Wedding : मुंबईत अंबानींचा हायप्रोफाईल लग्नसोहळा, वाहतुकीत महत्वाचे बदल; 'या' मार्गावर जाणं टाळा

T20 World Cup: 'तोही रडत होता अन् मीही, तेव्हा...', रोहितबरोबरच्या 'त्या' खास क्षणाबद्दल विराट झाला व्यक्त

Bajaj Freedom 125: बजाजने लॉन्च केली जगातील पहिली CNG बाईक! बजाज फ्रीडम 125 भारतात लॉन्च, किती आहे किंमत?

Snake Bite to Youth: सापानं चावा घेतल्यानंतर त्यानंही घेतला चावा! सापाचा झाला मृत्यू पण तरुणाचं काय झालं?

Mahesh Jethmalani: अदानीला संपवण्यासाठी चीन प्रयत्न करतोय का? महेश जेठमलानींचे धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT