Water crisis on world one billion citizens AWRA report Bahrain Kuwait condition sakal
देश

Water Crisis : जगातील एक अब्ज नागरिकांवर जलसंकट; ‘एडब्लूआरए’ अहवालाचा अंदाज

‘एडब्लूआरए’ अहवालाचा अंदाज; बहारीन, कुवेतची स्थिती गंभीर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पाण्याची वाढती मागणी आणि हवामान बदलाचे वेगाने ओढवणारे संकट यामुळे जगाला अभूतपूर्व जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

२०५० पर्यंत एक अब्ज लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’च्या (डब्लूआरआय) ‘अक्वेडक्ट वॉटर रिस्क ॲटलास’ (एडब्लूआरए) या अहवालात बुधवारी व्यक्त केली आहे.

‘एडब्लूआरए’च्या ऑनलाइन अहवालात जगभरातील जल स्थितीचा आढावा घेऊन त्याची माहिती प्रसिद्ध केली जाते. प्रत्येक चार वर्षांनी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे बहुतेक देश त्यांच्याकडील असलेल्या जलस्त्रोतांमधील सर्व पाण्याचा वापर करीत आहेत.

त्यांच्या अपारंपरिक पुरवठ्याच्या ८० टक्के पाणी वापरले जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जगातील २५ टक्के नागरिक ज्या २५ देशांमध्ये राहत आहेत, त्‍यांना दरवर्षी पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागते. यामध्ये बहारीन, सायप्रस, कुवेत, लेबनॉन आणि ओमान या देशांमध्ये अत्यंत गंभीर स्थिती आहे. अल्प काळ पडणाऱ्या दुष्काळामुळेही या देशांमध्ये जलस्रोत आटण्याचा धोका आहे.

‘‘या ग्रहावरील पाणी हा आपला सर्वांत महत्त्वाचा स्रोत आहे आणि तरीही आपण त्याचे व्यवस्थापन योग्य मार्गाने करत नाही,’’ अशी खंत ‘डब्लूआरआय’च्या जल कार्यक्रमाच्या प्रमुख आणि अहवालाच्या लेखिका समंथा कुझ्मा यांनी व्यक्त केली आहे. ‘जलक्षेत्रात मी गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहे. दुर्दैवाने या संपूर्ण काळात परिस्थिती साधारणपणे समानच आहे,’ असे त्या ‘सीएनएन’शी बोलताना म्हणाल्या.

गेल्या ५० वर्षांतील भीषण संकट

जगात १९६० पासून पाण्याची मागणी दुपटीने वाढली आहे. २०५० पर्यंत त्यात आणखी २० ते २५ टक्के वाढ होण्याचे भाकीत अहवालात व्यक्त केले आहे. वाढती लोकसंख्या, शेतीसारखे उद्योगांची गरज यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय अशाश्‍वत पाण्याच्या वापराचे धोरण आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीचा अभाव ही कारणेही आहेत.

मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिका हे जगातील सर्वाधिक पाणी टंचाई जाणवणारे प्रदेश आहेत. तेथील लोकांना या शतकाच्या मध्यापर्यंत पाण्याच्या भीषण टंचाईच्या छायेतच जगावे लागेल. पिण्याचे पाण्याचा अभाव, औद्योगिक क्षेत्रांचे नुकसान यामुळे होऊ शकते. या सर्वांचा परिणाम राजकीय संघर्षात होऊ शकतो, असे ‘एडब्लूआरए’ने म्हटले आहे.

मागणी १६३ टक्के वाढेल

सहारा वगळून समावेश होणाऱ्या आफ्रिकी देशांमध्ये (उप-सहारा प्रदेश) पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. ही वाढ पुढील २७ वर्षांत तब्बल १६३ टक्के असेल. अहवालातील नोंदीनुसार अमेरिकेतील सहा राज्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.

कोलोरॅडो नदीच्या खोऱ्यातील ॲरिझोना, न्यू मेक्सिको हे देश पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पहिल्या देशांपैकी आहेत. पाणी टंचाईमुळे जीवन कष्टमय बनते. अन्नसुरक्षेला धोका पोहचू शकतो आणि विजेचेही संकट निर्माण होते.

परंपरागत उपाययोजना

  • जलस्रोत आणि वनांचे जतन करणे

  • पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनासारखे तंत्र वापरावे

  • धोरणकर्त्यांनी पाण्यावर अवलंबून असणाऱ्या वीजनिर्मितीला पर्याय शोधावेत. उदा.पाणचक्की, पवनचक्की व सौर ऊर्जा

  • लास वेगास, सिंगापूर आदी शहरांत सांडपाणी प्रक्रिया आणि पाण्याचा पुनर्वापर आदी उपाय योजले. पण जागतिक पातळीवर याकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही.

उप-सहारा प्रदेशात पाण्याची मागणी गगनला भिडली आहे. लोकांना प्रामुख्याने घरगुती आणि सिंचनासाठी पाणी हवे आहे. पाणी बचतीच्या उपायांमध्ये गुंतवणूक केल्याने त्याची तीव्रता कमी झाली असली तरी या प्रदेशांना पाणी टंचाईचा फटका बसला नाही, असे नाही.’’

— समंथा कुझ्मा, प्रमुख, जल कार्यक्रम, डब्लूआरआय’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi-Trump: विजयानंतर ट्रम्प यांना पहिला फोन मोदींचा; म्हणाले, माझ्या मित्रासोबत...

Elon Musk on Trump Victory: ट्रम्प यांच्या विजयावर इलॉन मस्क यांची प्रतिक्रिया; म्हणाले, अपरिहार्य...

Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचा नेता अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष झाला; आठवलेंनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, भारत...

Mephedrone Case : मेफेड्रोन उत्पादन प्रकरणाचा खटला सुरू; ललित पाटीलसह २२ आरोपींवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT