New Parliament Water Leakage 
देश

Water Leakage in New Parliament: नव्या संसद इमारतीची काय ही अवस्था! वर्ष झाला नाही तोच लागली गळती; व्हिडिओ पाहाच

New Parliament Water Leakage News: यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

कार्तिक पुजारी

Water Leakage Parliament: काही महिन्यांपूर्वी भारतीय संसदेचे काम नव्या इमारतीमध्ये हलवण्यात आले आहे. मोठ्या थाटामाटात नव्या संसदेचे उद्घाटन झाले. पण, याच नव्या संसदेच्या इमारतीला गळती लागल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

मणिकम टागोर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, 'संसदेच्या बाहेर पेपर लीक होत आहेत आणि संसदेमध्ये पाणी लीक होत आहे. राष्ट्रपती वापरत असलेल्या संसदेच्या लॉबीमध्ये पाणी गळती होत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे. नवी इमारत बांधून नुकतेच एक वर्षे झाले आहे. त्यामुळे हा मुद्दा संसदेमध्ये उपस्थित करणार आहे.'

भारताच्या नव्या संसदेचे उद्घाटन २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. जुन्या संसदेचे उद्घाटन १८ जानेवारी १९२७ साली करण्यात आले होते. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज याच जुन्या इमारतीमध्ये सुरु होते. पण, पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी नव्या इमारत बांधणीचा प्रकल्प हाती घेतला होता.

मोदींनी 'शेंगोल' स्थापन करून नव्या इमारतीचे उद्घाटन केले होते. यावेळी साधू-संतांसह अनेक जण उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. जुन्या इमारतीमध्ये जागा कमी पडत होती, त्यामुळे नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली असं सरकारकडून सांगण्यात येतं. नव्या संसद इमारतीमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, विरोधकांनी या नव्या संसद इमारतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नव्या संसदेत अनेक त्रुटी राहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

नव्या संसदेमध्ये गळती सुरु झाली असल्याने विरोधकांना टीकेसाठी ही चांगलीच संधी मिळाली आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष एनडीए सरकारला धारेवर धरु शकतात. त्यामुळे भाजप यावर काय पवित्रा घेतं हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्लीला पावसाचा रेल अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा फटका संसदेला देखील बसलाय असं म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT