Wayanad Landslide Deaths Esakal
देश

Wayanad Landslide Deaths: वायनाड भूस्खलनात मृतांची संख्या 340 वर; 40 दिवसांच्या चिमुकलीला बचाव पथकाने वाचवले

Kerala Landslide: यादरम्यान, पाण्याच्या जोरदार प्रवाहात हयान अचानक वाहून गेला. हयान 100 मीटर दूर गेला आणि विहिरीजवळून जाणाऱ्या वायरला लटकला त्यानंतर बचाव पथकाने त्याला वाचवले.

आशुतोष मसगौंडे

वायनाडमध्ये भूस्खलन होऊन आता पाच दिवस झाले असून अजूनही पीडितांचा शोध सुरूच आहे. आतापर्यंत बचाव पथकांना 340 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान, अजूनही सुमारे 200 लोक अद्याप बेपत्ता आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 210 मृतदेह आणि 134 शरीराचे अवयव सापडले असून, त्यात 96 पुरुष, 85 महिला आणि 29 लहान मुलांचा समावेश आहे.

आतापर्यंत 146 मृतदेहांची ओळख पटलेली आहेत. प्रशासनाने घटनास्थळावरच 207 मृतदेह आणि 134 अवयवांचे शवविच्छेदन पूर्ण केले आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वायनाड, कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यातील 84 लोकांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर 187 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. घटनास्थळावरून 273 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वायनाड भूस्खलनात ४० दिवसांच्या मुलीची सुटका

वायनाड भूस्खलनात ४० दिवसांची मुलगी आणि तिच्या सहा वर्षांच्या भावाला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे.

केरळमधील वायनाड येथील भूस्खलनात एकाच कुटुंबातील सहा जण पुरात वाहून गेले. त्याचे घरही उद्ध्वस्त झाले. कुटुंबातील ४० दिवसांची मुलगी अनारा आणि तिचा सहा वर्षांचा भाऊ मोहम्मद हयान सुखरूप बचावले.

बचाव पथकाने दिलेल्या माहितीनुसार, अनारा आणि हयानला वाचवण्यासाठी त्यांची आई तंजिरा घराच्या छताला लटकून राहिली.

यादरम्यान, पाण्याच्या जोरदार प्रवाहात हयान अचानक वाहून गेला. हयान 100 मीटर दूर गेला आणि विहिरीजवळून जाणाऱ्या वायरला लटकला त्यानंतर बचाव पथकाने त्याला वाचवले.

या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारही एक्शन मोडवर आले आहे. केंद्राने पश्चिम घाटातील सुमारे 56,800 चौरस किलोमीटरचा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी मसुदा अधिसूचना जारी केली आहे.

या क्षेत्रात वायनाडची १३ गावे आणि केरळ राज्यातील अंदाजे १०,००० चौरस किलोमीटरचा समावेश आहे. या मसुद्यात पश्चिम घाटातील ३६ टक्के भाग पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव आहे.

वायनाडमधील भीषण दुर्घटनेसाठी अनियंत्रित औद्योगिकरणाला जबाबदार धरण्यात आले आहे. सहा राज्यांमध्ये पसरलेल्या पश्चिम घाटाच्या क्षेत्रांना पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया 2013 पासून सुरू आहे.

पश्चिम घाट हे गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि इतर अनेक नद्यांचे उगमस्थान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT