Wayanad Landslide Death Esakal
देश

Kerala Landslide: "कोणीतरी या, वाचवा..." वायनाड भूस्खलनात आतापर्यंत 143 जणांचा मृत्यू; पाहा काळीज चिरणारी दृश्यं

Wayanad landslides: केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात भूस्खलनामुळे सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरे, फुगलेल्या नद्या आणि उन्मळून पडलेल्या झाडांची दृश्ये दिसत आहेत.

आशुतोष मसगौंडे

केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी मोठ्या प्रमाणात भूस्खलनामुळे सर्वत्र उद्ध्वस्त झालेली घरे, फुगलेल्या नद्या आणि उन्मळून पडलेल्या झाडांची दृश्ये दिसत आहेत.

सध्या भूस्खलनग्रस्त भागात लष्कर पोहोचले आहे. एनडीआरएफसह अनेक पथके बचाव कार्य करत आहेत. अशात यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 143 वर पोहचला आहे.

"कोणीतरी या आणि आम्हाला वाचवा, मदत करा, आम्ही आमचे घर गमावले आहे. कुटुंबातील सदस्य जिवंत आहे की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. ते दलदलीत अडकले आहेत. त्याचे तोंड चिखलाने भरलेले आहे. कोणीतरी त्यांना वाचवा," अशी विनंती वायनाडमधील चुर्लामाला भागात भूस्खलनात अडकलेली महिला करत होती.

भूस्खलनामुळे झालेल्या विध्वंसानंतर जिल्हा रुग्णालयात रडणारे लोक जमिनीवर पडलेल्या मृतदेहांच्या रांगेत आपल्या प्रियजनांना शोधत होते. आपल्या प्रियजनांचे मृतदेह पाहून काहींना धक्का बसला, तर ज्यांचे नातेवाईक जखमी झाले त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

एका तरुणीने सांगितले की, "भूस्खलनानंतर दोन मुलांसह तिच्या कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता आहेत."

एका स्थानिक अंगणवाडी सेविकेने सांगितले की, "ती चार जणांच्या कुटुंबाचा शोध घेत आहे, ज्यात एका 12 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे जिला ती बऱ्याच काळापासून ओळखत होती. सकाळी त्याच्या काही नातेवाईकांनी मला फोन केला आणि संपूर्ण कुटुंब बेपत्ता असल्याचे सांगितले. दुर्दैवाने, मला अद्याप त्यापैकी काहीही सापडले नाही."

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, वायनाडमधील आतापर्यंत 250 लोकांना वाचवण्यात आले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

बचाव आणि मदत कार्यासाठी विविध केंद्रीय यंत्रणांचे 300 जवान तैनात करण्यात आले आहेत. राय यांनी राज्यसभेत सदस्यांना मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली.

त्यांनी असेही सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT