Arvind Kejriwal file photo
देश

लसीकरण पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस द्या : अरविंद केजरीवाल

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविणार

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉनची (Omicron Cases In India) वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal On Booster Dose) यांनी पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. राजधानी दिल्लीमध्ये ओमिक्रॉन बाधितांची संख्या 24 वर पोहोचली आहे. तर देशातील इतर राज्यांमध्येदेखील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. (Delhi Omicron Cases raise to 24)

दरम्यान, वाढती कोरोना रूग्णांची (Coroan) संख्या पाहता होम आयसोलेशनला (Home Isolation) अधिक प्राधान्य देण्याच्या दृष्टीने 23 डिसेंबर रोजी आढवा बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये आढळणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे नमुने खबरदारीचा उपाय म्हणून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing for Omicron) पाठविण्यात येणार असल्याचेदेखील केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

तिसरी लाट येईल पण सौम्य

भारतात नव्या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. देशात सध्या मोठ्या प्रमाणावर इम्युनिटी पॉवर लोकांमध्ये तयार झाली असल्यानं दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट थोडी सौम्य असेल. मात्र तिसरी लाट येईलच. सध्या देशात ७ हजार ५०० नवे रुग्ण आढळत आहेत. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग पाहता ही संख्या वाढेल असंही विद्यासागर यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. तिसरी लाट आली तरी देशातील कोरोना रुग्णांची दर दिवशी रुग्ण संख्या ही दोन लाखांपेक्षा जास्त नसेल असंही विद्यासागर यांनी म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT