भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस साजरा होत आहे.
BJP Foundation Day : भारतीय जनता पक्षाचा (BJP) आज स्थापना दिवस साजरा होत आहे. 1980 मध्ये या दिवशी भाजपची स्थापना झाली. यापूर्वी 1951 ते 1977 पर्यंत भारतीय जनसंघ आणि 1977-80 पर्यंत जनता पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. या भगव्या पक्षाचं एकेकाळी संसदेत फक्त दोनच खासदार होते. आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन टर्म पूर्ण बहुमताचं सरकार आहे. (BJP Foundation Day News)
यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं केंद्रात आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. मात्र, त्यांना विरोधकांच्या अविश्वास ठरावालाही सामोरं जावं लागलं. अविश्वास प्रस्तावावर मतदान करण्यापूर्वी वाजपेयींनी संसदेत शानदार भाषण केलं. या दिवशी त्यांनी भाजपविषयी आपलं मत व्यक्त केलं.
संसदेतील भाषणात ते म्हणाले, भाजपची उभारणी करण्यासाठी आम्ही खूप तपश्चर्या केलीय. भाजप कोण एकाची पार्टी नाहीय, तर प्रत्येक सदस्याचा तो पक्ष आहे. विरोधक संसदेतून आम्हाला हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. देशाच्या भल्यासाठी त्यांचंही स्वागत आहे. आपणही आपल्या परीनं देशाची सेवा करत आहोत. आम्ही नि:स्वार्थीपणे देशाची सेवा केलीय. राजकारणात आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या या प्रयत्नांमागं 40 वर्षांची साधना आहे. हा काही चमत्कार नाहीय. भाजपनं खूप मेहनत घेतलीय. भाजप हा 365 दिवस टिकणारा पक्ष आहे, असंही ते म्हणाले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.