बिपरजॉय चक्रिवादळाने राजस्थानमध्ये धुमाकूळ घातला आहे. रविवारी वादळामुळे पाली, सिरोही, राजसमंद, उदयपूर, बाडमेरमध्ये मुसळधार पाऊस झाला. तर, मध्य व पूर्व भागात उष्मघातामुळे लोकांचा जीव गेला आहे. (weather update Flood Situation In Many Districts In Rajasthan Heat wave warning Bihar Vidarbha)
गेल्या २४ तासांत सांचौरमध्ये २२, माउंट अबू-१५, शिवगंज-१३.२५ इंच पावसाची नोंद झाली. ५०० हून जास्त गावांत वीजपुरवठा खंडित झाला. पाली, जालौर, बाडमेर, सिरोही चारही जिल्ह्यांत मान्सूनमधील कोटा पूर्ण झाला आहे. Weather Updates
वाळवंटात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरांत पाच फूट पाणी साचले पाली जिल्ह्यात ८, तर सांचौरमध्ये ५ बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. पांचला धरण फुटल्याने सांचौर जलमय झाले. विविध दुर्घटनांत तीन जणांचा मृत्यू झाला. राजस्थानात ३०० मिमी पाऊस झाला.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या एकट्या बलिया जिल्ह्यात उष्णतेमुळं 54 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये गेल्या 24 तासांत 35 जणांचा मृत्यू झाला. Weather Updates
महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
हवामान विभागाने पुढील 24 तासासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नियमावली जारी केली आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत नागरिकांना कामाव्यतिरिक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. झारखंड आणि जमेशदपुरामध्ये देखील तापमान 44 अंशावर गेले आहेत. तसेच विदर्भात देखील सध्या उष्णता वाढत आहे. Weather Updates
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांना चार दिवस उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागेल, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.Weather Updates
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.