Weather Update IMD Alert esakal
देश

IMD Weather Update : 'या' भागांत तापमानात होणार घट तर काही राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता!

दक्षिण भारतापासून उत्तरेपर्यंत वाढत्या तापमानामुळं सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय.

Balkrishna Madhale

उत्तर भारतातील काही भागात हलक्या सरी बरसल्यामुळं नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता.

Weather Update : दक्षिण भारतापासून उत्तरेपर्यंत वाढत्या तापमानामुळं सामान्य जनजीवन विस्कळीत झालंय. कडक ऊन आणि उष्माघातामुळं लोकांचं जगणं मुश्किल बनलंय. त्याच वेळी, भारतीय हवामान विभागानं (IMD) पुढील आठवड्यासाठी हवामानाचा अंदाज वर्तवलाय.

त्यानुसार, पुढील पाच दिवसांत पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पूर्व भारतातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. मात्र, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

'या' राज्यांत उष्णतेची लाट संपली

बर्‍याच दिवसांच्या तीव्र उष्णतेच्या लाटेनंतर, पश्चिमी विक्षोभ आणि उत्तर प्रदेशमधील चक्रीवादळामुळं बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये उष्णता कमी झाली आहे, असं शुक्रवारी आयएमडीच्या अहवालात म्हटलंय. पश्चिम बंगालमध्ये 10 दिवसांनी, बिहारमध्ये 7 दिवसांनी आणि ओडिशामध्ये 5 दिवसांनंतर उष्णतेची लाट संपली आहे.

हलक्या पावसामुळं लोकांना दिलासा

गुरुवारी उत्तर भारतातील काही भागात हलक्या सरी बरसल्यामुळं नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला होता. हलक्या पावसानंतर उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह अनेक राज्यांच्या तापमानात किंचित घट झाली. गेल्या आठवड्यात बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये असलेली उष्णतेची लाट ओसरली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील 4-5 दिवस पूर्व भारतात सौम्य तापमान कायम राहण्याची शक्यता आहे.

'या' राज्यांमध्ये पडणार पाऊस

IMD च्या अंदाजानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, दुसरीकडं पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि पंजाबमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ओडिशामध्ये हलका पाऊस पडू शकतो. 22 आणि 23 तारखेला ओडिशामध्ये आणि 24 एप्रिल 2023 रोजी बिहारमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांत मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. आज 22 एप्रिल रोजी छत्तीसगड आणि विदर्भाच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT