Weather Update 
देश

Weather Update: पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मोचा चक्रीवादळामुळे बदलणार हवामान

मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार

धनश्री ओतारी

मोचा चक्रीवादळ आज पश्चिम बंगालच्या उपसागरात धडकणार आहे. याचा परिणाम देशातील अनेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे. तीन राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Weather update Mocha Cyclone impact Heavy rainfall 08 h to 12 May )

हवामान विभागाने महाराष्ट्रासह इतर काही राज्यांना अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भ आणि छत्तीसगड भागात आज मुसळधार पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पिकांचे मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाल उपसागर, द.अंदमान समुद्रात ८ मे ला कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर ९मे पर्यंत ते अजून तीव्र (depression) होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन बंगाल उपसागरात उत्तरेकडे प्रवास सुरू होईल. अंदमान,निकोबारला ८-१२ मे मुसळधार-अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

समुद्र या कालावधीमध्ये अधिक खवळलेला राहील. त्यामुळे मच्छिमारांना आणि पर्यटकांनाही समुद्रकिनारी न जाण्याचा इशारा दिला आहे. ओडिशाला याचा जास्त धोका असल्याने प्रशासन अलर्टवर आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने यापूर्वीच जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसाठी वादळ आणि पावसाबद्दल यलो अलर्ट जारी केला होता. तर दिल्ली-एनसीआरमध्येही वादळ आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT