weather update  google
देश

Weather Update: मान्सून केरळमध्ये तर महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार?

वादळी वाऱ्यांमुळे मान्सून केरळमध्ये यंदा उशिराने दाखल

धनश्री ओतारी

केरळमध्ये मान्सून उशिराने दाखल झाला असून आता राज्यात पाऊस कधी हजेरी लावणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. वादळी वाऱ्यांमुळे मान्सून केरळमध्ये यंदा उशिराने दाखल झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही आणखी प्रतीक्षा पाहावी लागणार आहे. हवामान विभागानुसार, मान्सून १८ जूनपर्यंत दक्षिणेतून महाराष्ट्रात दाखल होईल, असे सांगण्यात येत आहे.(Weather Update Monsoon in Kerala Maharashtra Rain June 18 Biparjoy IMD)

मान्सून साधारणपणे 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो. पण, आता केरळमध्ये पाऊस उशिरा आल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे. Weather Updates

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी राज्यातील पावसाबाबत माहिती दिली आहे. आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस.जी. कांबळे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात 10 जून आणि मुंबईत 11 जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे.Weather Updates

मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचला असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवलं जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल.

मुंबईसह तळकोकणात १८ जूनला येणार मान्सून

मान्सून १८ जूनदरम्यान मुंबईसह तळकोकणात येण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत स्थिरावल्यानंतर तो सह्याद्री ओलांडत उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणत: दहा दिवसांनी तो राज्यात येतो. Weather Updates

१० जूनपर्यंत मान्सून कर्नाटकात दाखल होण्याची शक्यता असून त्यानंतर तो तळकोकणासह मुंबईत येईल. शुक्रवारपासून (दि. ९) १२ जूनपर्यंत मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. Weather Updates

यादरम्यान मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Exclusive Interview : 'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही'; महत्त्वाचं विधान करत असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Phalodi Satta Bazar: महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?

AUS vs PAK: मालिका गमावली, पाकिस्तान संघाने कर्णधार Mohammad Rizwan विश्रांती दिली; २ ट्वेंटी-२० खेळलेल्या खेळाडूला केलं कॅप्टन

Mallikarjun Kharge : जनता माफ करणार नाही...मणिपूर हिंसाचारप्रकरणी खर्गे यांची टीका

NIOT भर्ती 2024: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सुवर्ण संधी, परीक्षा शिवाय थेट निवड

SCROLL FOR NEXT