West Bengal Election 2021 esakal
देश

भाजपला धक्का! 5 आमदारांनी सोडला पक्षाचा WhatsApp Group

सकाळ डिजिटल टीम

ममता बॅनर्जींचा पाडाव करण्यासाठी निवडणुकीत भाजपनं आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा मैदानात उतरवली होती.

कोलकाता : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत (West Bengal Election Results 2021) ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसनं भाजपचा (BJP) दारुण पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. ममता बॅनर्जींचा पाडाव करण्यासाठी या निवडणुकीत भाजपनं आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र, या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर, भाजपवर 'बुरे दिन' आल्याची वेळ आलीय. बंगालात अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress Party) प्रवेश केलाय. दरम्यान, आणखी 5 आमदारांनी पक्षाचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप देखील सोडल्याचं कळतंय. या आमदारांच्या नाराजीचं कारण त्यांच्या समाजातील नेत्यांना प्राधान्य न देणं, हेच सांगितलं जातंय.

पक्षाचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप (BJP WhatsApp Group) सोडलेल्या भाजप आमदारांमध्ये असीम सरकार (नादियातील हरिंघाट आमदार), अंबिका रॉय (नादियातील कल्याणी आमदार), सुब्रत ठाकूर (उत्तर 24-परगणामधील गायघाट आमदार), मुकुटमणी अधिकारी (दक्षिण नादियामधील राणाघाट आमदार), अशोक कीर्तनिया (उत्तर 24-परगणातील बाणगाव उत्तर आमदार) यांचा समावेश आहे. बहुतांश आमदार हे मतुआ समाजातील (Matua Society) असून त्यांनी पक्षाचा अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याची शक्यता वर्तवली जातेय. प्रत्यक्षात फेरबदलाच्या यादीत जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रभारी विभाग आणि निमंत्रकांच्या यादीत त्यांच्या समाजातील नेत्यांना महत्त्व देण्यात आलं नाही, त्यामुळं हे आमदार नाराज असल्याचं कळतंय. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेश भाजप अध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले, मला याची कोणतीच माहिती नाही. माहिती मिळाली तर आपल्याला कळवतो, असं सांगून त्यांनी वेळ मारुन नेली.

भाजप आमदारांची 'घरवापसी'

या नाराज आमदारांमुळं पश्‍चिम बंगालमध्ये भाजपातील 'वाद' आता चव्हाट्यावर आला आहे. 11 मे रोजी ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांनी पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर, राजकीय चित्र झपाट्यानं बदलतंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले अनेक टीएमसी नेते आता 'घरवापसी'साठी टीएमसीच्या संपर्कात येत आहेत. भाजप नेते शंतनू ठाकूर हे नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं कळतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT