कोलकाता- West Bengal Assembly election 2021 पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु केला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चांगली खडाजंगी पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या बांकुरामध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टिकास्त्र सोडले. आज माझे हेलिकॉप्टर खराब झाले, पण मी यामागे कुणाचा कट असल्याचं म्हणणार नाही, असं शहा म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चपासून मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे. ममतादीदींना राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी आहे, पण भाजपने त्यांच्यासमोर कडवे आवाहन उभे केले आहे. २ मेला पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
अमित शहा म्हणाले की, 'आज मला जरा उशिर झाला, कारण माझं हेलिकॉप्टर खराब झाले होते. पण, मी आता असं म्हणणार नाही की यामागे कोणाचे षडयंत्र होते'. अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. निवडणूक आयोगाने स्पष्य केलंय त्यांना झालेली जखम एक अपघात होता. पण, ममता बॅनर्जी म्हणताहेत की त्यांना झालेल्या दुखापतीमागे कट होता. दीदी विनाकारण यामध्ये राजकारण करत आहेत, असं अमित शहा म्हणाले. बांकुराच्या आधी अमित शहांना झारग्राममध्ये रॅलीला संबोधित करायचे होते, पण हेलिकॉप्टर खराब झाल्यामुळे त्यांना व्हर्च्युअल पद्धतीने सभेला संबोधित करावे लागले.
अमित शहा म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या पायाला जखम झाली आहे, पण हे कशामुळे झाले याचा पता लागू शकलेला नाही. टीएमसीचे म्हणणं आहे की, 'यामागे कोणाचा तरी हात आहे, पण निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय की हा केवळ एक अपघात होता. दीदी तुम्ही पूर्ण पश्चिम बंगालमध्ये व्हील चेअरवरुन फिरत आहात. तुमच्या दुखापतीची चिंता आहे, पण आमच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांसाठी तुमच्या मनात काही दु:ख नाही का, ज्यांना मारुन टाकण्यात आले आहे.'
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. नंदीग्राममधील एका रॅलीदरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. शिवाय हा हल्ला भाजप पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ममतादीदी सध्या व्हील चेअरवरुन निवडणुकीचा प्रचार करत आहेत. माझ्या दुखापतीच्या त्रासापेक्षा मला माझ्या राज्याच्या लोकांची जास्त काळजी आहे. मी त्यांना एकटे सोडू शकत नाही, असं त्या एका रॅलीदरम्यान म्हणाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.